राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन तिरंगा घेऊन बोधपर पत्रकांची वाशीत प्रभात फेरी

मॉडर्न स्कूल वाशीत  झळकला हर घर तिरंगा  

नवी मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभाग,ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे यांनी प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी व रयत शिक्षण संस्थेचे मॉडर्न स्कूल वाशी  यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एक अनोखा कार्यक्रम बुधवारी रोजी आयोजित केला होता. 

मॉडेल स्कूल,वाशीच्या प्रांगणातून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील वीरांचे गणवेश परिधान करून सेक्टर-6 ते सेक्टर ७ वाशी अशी प्रभात फेरी काढली. मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे सर्व कार्यकारणी सदस्य तथा ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी व कर्मचारी यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन तथा नारे बोलून हातात तिरंगा घेऊन तथा बोधपर पत्रकांनी वाशीची प्रभात देशभक्तीमय झाली.  

मॉडर्न स्कूल मधील विशेष सभेत पुस्तकांचे प्रदर्शन तथा हुतात्म्यांच्या चित्राचे प्रदर्शन ग्रंथालय विभागाने आयोजिले होते.त्याचे उद्घाटन नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त  जयदीप पवार यांनी केले. मुलांची संवाद साधताना त्यांनी उदाहरणे देऊन देशभक्तीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी प्रमुख वत्ते म्हणून रा.फ.नाईक विद्यालयाचे प्रा.रवींद्र पाटील यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मुलांना समजून सांगताना इतिहासाचे उत्तमोत्तम प्रसंग आपल्या भाषणातून व्यक्त केले. प्रा.माणिकराव कीर्तने ग्रंथालयाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी यांनी ध्वजाचे महत्त्व व तो कसा बनला हे सोफ्या भाषेत मुलांना सांगितले. 

यावेळी ग्रंथालय अधिकारा प्रशांत पाटील यांचे आयोजन,मॉडर्न स्कूल प्राचार्या सुमित्रा भोसले यांची सहका-सोबत साथ, वाघ सरांचे मार्गदर्शन तथा प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालयाचे सुभाष कुळकर्णी यांचे सक्रिय सहकार्य ध्वजाला व कार्यक्रमालाही उंची देऊन गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप जांभळे यांनी केले. सदर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सायकल रॅलीद्वारे घरोघरी तिरंगा उपक्रमाचा ऐरोलीत प्रचार