दिवाळे गांवची ‘स्मार्ट व्हिलेज'कडे वाटचाल

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून डोलकर मच्छिमारांसाठी जेट्टी, सोलर हायमास्टची सुविधा

नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदा यांचे भारत देशातील संपूर्ण गावांचे ‘स्मार्ट व्हिलेज'चे स्वप्न तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गांव दत्तक योजना अंतर्गत ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळे गांव दत्तक घेतले आहे. दिवाळे गावाचा पूर्ण कायापालट करुन टाकला असून नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गांवचे नाव दिल्ली पर्यंत घेऊन जाण्याचा मानस आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केला आहे.

सन २००४ साली ‘विधान परिषद'च्या आमदार म्हणून धुरा हाती घेतल्यावर पहिली छोटी जेट्टी स्थानिक डोलकर मच्छीमार बांधवांकरिता ५ लाखाच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून बांधण्यात आली. परंतु, त्याकाळी जेट्टीचा अनुभव नसल्यामुळे छोटी जेट्टी उभारण्यात आली. परंतु, कालांतराने जेट्टी विषयक संपूर्ण माहिती घेण्यात आली तेव्हा फगवाले आणि खांदेवाले येथे भव्यदिव्य अशी जेट्टी उभारण्यात आली. तेव्हा सदर सर्व सुधारणांचा अवशेष घेऊन डोलकर मच्छीमार बांधवांकारिता नव्याने जेट्टीची उभारणी केली जात आहे. सदर कामाचे भूमीपुजन नुकतेच आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या जेट्टी करिता महाराष्ट्र शासनाने जवळपास १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केले असून या निधीमधून सर्व सुविधायुक्त जेट्टी उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नव्याने होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरच जेट्टी उभारली जात असल्याने येथील स्थानिक मच्छीमार बांधवांना व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच सोलर हायमास्टसाठी तब्बल २५ कोटी रुपये एवढा मोठा निधी उपलब्ध केला असून त्याने संपूर्ण नवी मुंबई लख्ख प्रकाशित होणार आहे,  अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली. मी फक्त बोलत नाही तर मी १० कोटी आणि २५ कोटींचा निधी उपलब्ध करुन संबंधित कामांचे भूमीपुजनही केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, दिवाळे गावाला जेवढे काही देता येईल तेवढे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. स्मार्ट व्हिलेज अंतर्गत दिवाळे गांंवच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कोटींची तरतूद करण्यात आलेली सर्व सुविधांयुक्त मच्छी मार्केट, सुसज्ज शाळा, उद्यान, मासे सुकविण्यासाठी प्लॅटफॉर्म, स्टेज, समाज मंदिर, रिंगरोड, स्वाध्याय हॉल, प्रसाधनगृहे, लहान मुलांकरिता खेळणी, विरंगुळा केंद्र, गजेबो गार्डन, बहुउद्देशीय इमारत, ओपन जिम, चारचाकी वाहनतळ, भाजी-फळ मार्केट तसेच परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. याकरिता आमदार निधीची तरतुदही करण्यात येणार आहे. दिवाळे गांव स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. चांगले शिक्षण, आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळणार आहे. स्वच्छता-सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

याप्रसंगी ‘उत्तर भारतीय मोर्चा'चे राजेश राय, दर्शन भारद्वाज, जयश्री चित्रे, वेंकट चिखले, निलेश पाटील, निलेश डोंगरे,  ज्ञानेश्वर कोळी, नीळकंठ कोळी, संतोष कोळी, डोलकर मच्छीमार सदस्य तुकाराम कोळी, ‘खांदेवाले मच्छीमार संघटना'चे अध्यक्ष रमेश हिंडे, ‘ज्येष्ठ नागरिक संस्था'चे अध्यक्ष चंद्रकांत कोळी तसेच ‘भाजपा'चे पदधिकारी आणि स्थानिक कोळी बांधव उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रत्येक गांव स्मार्ट व्हिलेज तयार करावे, असे स्वप्न बघितले आहे. त्याअनुषंगाने दिवाळे गांव आता स्मार्ट व्हिलेज म्हणून तयार होणार आहे. यामुळे संपूर्ण दिवाळे गावातील कोळी बांधवांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातारण पसरले असून गावातील ग्रामस्थांनी याबद्दल मला धन्यवाद दिले आहेत. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 उरण लोकल तात्काळ सुरु करण्याची मागणी