ज्ञानाच्या पीठाची दिव्यदृष्टी...!

जगाकडे बाहेर पाहण्याची दृष्टी जेव्हा नष्ट होते तेव्हा प्रभूकृपेने स्वतःमध्ये पाहण्याची दृष्टी देव तुम्हाला बहाल करतो. तीच दिव्यदृष्टी..रामजन्मभूमीचा निर्णय हिंदूंच्या बाजूने झुकला तो जगद्‌गुरु रामभद्राचार्यजी यांच्या वक्तव्यामुळे! जे प्रज्ञाचक्षू आहेत. सध्या ते चित्रकुट येथील धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तुलसी पीठ नामक विकलांग विश्वविद्यालयाचे संस्थापक व आजीव कुलगुरु आहेत. भारत सरकारने २०१५ ला त्यांच्या अद्‌भूत कार्याची दखल घेऊन पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.   

 मध्ययुगीन १५व्या शतकातील प्रसिद्ध हिंदी भक्तकवी म्हणून आपण सूरदास यांना ओळखतो. त्यांचा जन्म सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. ते जन्मांध होते. बालपणापासून ते गानविद्येत अत्यंत कुशल होतेच; सोबत त्यांना ज्योतिष व शकुनविद्या अवगत होती. गुरु वल्लभाचार्य यांनी त्यांना कृष्ण भक्तिपर पदे रचण्याची आज्ञा केली. कृष्णाच्या बाललीला व शृंगार क्रिडावर त्यांनी सहस्त्रावधी पदे रचली तथा साधुत्व, गीतमाधुर्य व गानकौशल्यामुळे ते कृष्णभक्तांना मंत्रमुग्ध करतं.      

तानसेनच्या मध्यस्थीने अकबर बादशहाने त्यांची मथुरेत भेट घेतली. सूरदासांच्या पदावर लुब्ध होऊन अकबराने त्यांची स्तुतीकवने रचण्याची आज्ञा सुरदासांना केली. मी केवळ कृष्ण कीर्तने करतो म्हणून त्यांनी नकार दिला. तरीही अकबराने त्याचा रोष न मानता त्यांची अनेक पदे फारसीत अनुवादित करून त्याचा आस्वाद घेतला. हिंदी साहित्यातील सूर(सूर्य) म्हणून त्यांना ओळखले जाते. जन्मांध असताना सूरसागर ग्रंथाव्दारे काव्य व संगीत याचा उत्तम मिलाप साधला हे त्यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करतं.   

 जगाकडे बाहेर पाहण्याची दृष्टी जेव्हा नष्ट होते तेव्हा प्रभूकृपेने स्वतःमध्ये पाहण्याची दृष्टी देव तुम्हाला बहाल करतो. तीच दिव्यदृष्टी..  सूरदासांच्या विषयी आपण वाचतो व त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो, जेव्हा त्याच दिव्यदृष्टीचा प्रत्यय आपणास येतो.   

 रामजन्मभूमीचा निर्णय हिंदूंच्या बाजूने झुकला तो जगद्‌गुरु रामभद्राचार्यजी यांच्या वक्तव्यामुळे! जे प्रज्ञाचक्षू आहेत. त्यांची साक्षएका मुस्लिम न्यायाधीशासमोर चालू होती, तेव्हा त्यांना प्रश्न केला गेला की, ‘तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी वेदात पुरावे शोधता मग श्रीरामाचा जन्म नेमक्या कोणत्या ठिकाणी झाला याला वेदात उत्तर देऊ शकता कां?' रामभद्राचार्यजींनी एकही क्षण न गमावता ऋग्वेदातील जैमिनीय संहितेमधून तपशीलवार माहिती दिली. ती तपासल्यावर मुस्लिम न्यायाधीशांनी कबूल केले की एक व्यक्ती जी भौतिकदृष्ट्या चक्षुहीन आहे, ती वेद आणि धर्मग्रंथांच्या अवाढव्य सागरातून इतकी समर्पक उत्तरे देतेय ही बुद्धिमत्तेची अद्‌भुत व दैवी शक्तीच होय.     

 जगद्‌गुरु रामभद्राचार्यजींचे २२भाषांवर प्रभुत्व असून तब्बल ८०ग्रंथाची निर्मिती त्यांनी केलीय. जगद्‌गुरु स्वतः वाचन, लेखन व ब्रेल लिपीचा वापर करत नाहीत. केवळ श्रवणाने ज्ञान आत्मसात करून तोंडी सांगून लिहवून घेतात. संत तुलसीदास चरित्राच्या भारतातील सर्वश्रेष्ठ जाणकारांपैकी ते एक आहेत.                                              

सध्या ते चित्रकुट येथील धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तुलसी पीठ नामक विकलांग विश्वविद्यालयाचे संस्थापक व आजीव कुलगुरु आहेत. भारत सरकारने २०१५ ला त्यांच्या अद्‌भूत कार्याची दखल घेऊन पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. दृष्टी नसतानाही ईश्वराप्रती श्रद्धा ठेवून साहित्यकृतीतून मानव सेवा केलेली पाहून असं वाटतं की, आपण दृष्टी असताना कसं जीवन व्यतीत करतोय..ही गोष्ट डोळे मिटून अंतर्मुख करणारी आहे. ज्ञानपीठ शब्दालाही थोरवी बहाल करणा-या अश्या थोर व्यक्तिमत्वांपुढे नकळतपणे नतमस्तक होऊन मुखातून एवढेच उद्गार निघतात..दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती.. -दिलिप जांभळे. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी