राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांवर अर्वाच्य भाषेमध्ये टिका

राष्ट्रवादी आणि शिवसेना तर्फे नेरुळ, वाशी पोलिसांकडे  तक्रार

वाशी : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांच्या विरोधात अर्वाच्य भाषेमध्ये फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विशाल गोरडे या विकृत व्यवतीविरुध्द  तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकात पाटील तसेच  शिवसेना (उबाठा) नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर यांनी पोलिसांकडे केली आहे.

विशाल गोरडे या विकृत व्यक्तीने २४ डिसेंबर रोजी शरद पवार, खा. सुप्रियाताई सुळे, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आ. रोहित पवार यांच्या विरोधात अर्वाच्य भाषेमध्ये फेसबुकवर अपेक्षार्ह टाकली आहे. विशल गोरडे यासारख्या मनुस्मृती प्रवृत्तीच्या व्यक्तींना तात्काळ निर्बंध बसणे गरजेचे आहे. त्यामुळे सदर व्यक्तीचा तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी ‘नेरुळ पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्याकडे तसेच नेरुळ सायबर क्राईम ब्रँच यांच्याकडे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकात पाटील, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या नवी मुंबई जिल्हा महिलाध्यक्ष सलुजा सुतार, कार्याध्यक्ष जी. एस. पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रसंगी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे मच्छिमार सेल नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राहुल म्हात्रे, तालुका अध्यक्ष रघुनाथ गोळे, नरेश कालेकर, प्रशांत पाटील, सुरेश शिंदे, शालिनी म्हात्रे, प्रवीण पाटील, सोशल मिडिया अध्यक्ष तेजस फणसे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या नवी मुंबई जिल्हा महिला उपाध्यक्ष साधना बर्गे, वॉर्ड अध्यक्ष पुष्पा पावले, तालुका अध्यक्ष जयेश चव्हाण, अंकुश म्हात्रे, रुजान चिलवान, राज सुतार, गजानन जाधव तसेच इतर पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर वाशी पोलीस ठाणे मध्ये देखील शिवसेना (उबाठा) नवी मुंबई जिल्हाध्यक्ष वि्ील मोरे आणि द्वारकानाथ भोईर यांच्या द्वारे विशाल गोरडे याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दिवाळे गावातील ज्येष्ठांना नवीन वर्षाची भेट