पादचारी पुलावरील जाहिरात फलक धोकादायक ?

नवी मुंबई -:नवी मुंबई शहरात रस्त्यावरील पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात बाजी केली जात आहे. मात्र सदर जाहिरात फलक जर वाहनांवर पडले तर मोठी दुर्घटना होऊन कुणाच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाहिरात बाजी करणाऱ्यांवर मनपा प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी आताजोर धरू लागली आहे.

नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात बाजीला नेहमीच उधाण आलेले असतेआणि यावर कारवाई करण्यासाठी आयुक्त नेहमीच आदेश देत असतात .मात्र यातील बहुतेक जाहिरात फलक हे राजकीय नेत्यांचे असल्याने मनपा अधिकारी अशा कारवाईकडे सोयीनुसार  कानाडोळा करीत आलेले आहेत. मात्र हेच जाहिरात फलक आता नागरिकांच्या जिवावर बेतू शकतात.जाहिरात करताना ते जाहिरात फलक जास्तीत जास्त नागरीकांना दिसावे म्हणून जाहिरातदार महामार्ग, रस्त्याच्या पादचारी पुलाचा वापर करीत आहे. मात्र याच पादचारी पुलाखालून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने धावत असतात आणि जर असे जाहिरात फलक या भरधाव वाहनांवर पडले तर मोठी दुर्घटना होऊन वाहन चालकांच्या  जीवावर बेतू शकते त्यामुळे अशा जाहिरातबाजांवर  कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल नाईक यांनी केली आहे.


 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 हर घर तिरंगा अभियान साठी कोंकण विभाग सज्ज -डॉ. महेंद्र कल्याणकर