खारघर मध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा

खारघर :   खारघर  शहरात सध्या अनेक ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याला वेगळाच  वास येत असल्याने ते कसे प्यावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

    खारघर शहरात स्वाईन फ्ल्यू,हिवताप आणि डेंग्यू साथीच्या रुग्णांची संख्या वाढत असतात, त्यात आता गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण  झाला आहे. खारघर सेक्टर एकोणीस मध्ये गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना बिसलेरी पाणी विकत घेवून गरजा पूर्ण कराव्या लागत आहे. काही दिवसापूर्वी खारघर मधील घरकुल तसेच सेक्टर बारा मधील विसावा, शिवाजी, सामुद्रिका, जागृत, सूर्योदय, शिवसागर या सोसायटी दूषित पाणी दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी रहिवासीयांनी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडे केली. सिडकोने सदर पाणी तपासणी केली असता,पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगितले. मात्र तरीही पाण्याला वेगळाच प्रकारचा वास येत असल्यामुळे पाणी कसे प्यावे असा प्रश्न रहिवासीयांना पडला आहे. 
 
दरम्यान मंगळवारी खारघर सेक्टर 18 आणि 19  मध्ये गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मणेश पाटील यांनी सिडको अधिकाऱ्याकडे तक्रार करून समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे.या विषयी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागात विचारणा केली असता, सेक्टर 14 मेट्रो पुलाखाली जलवाहिनी दुरुस्तीच्या माती गेल्यामुळे गढूळ पाणी आले होते, त्यानंतर नियमितपणे प्रमाणे पाणी पुरवठा होत असल्याचे सांगितले.
 
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खोपटा- कोप्रोली रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू