काँक्रीटीचे रस्ते उभारण्यासाठी दोन वर्षांपासून पत्र व्यवहार करूनही सिडकोकडून दुर्लक्ष

तळोजा वसाहतीत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती न घेतल्यास - मनसे स्टाईल आंदोलन   

खारघर:  तळोजा वसाहती मधील रस्त्यावर डांबरीकरण करण्याऐवजी आर सी सी सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते उभारण्यात यावे या साठी दोन वर्षांपासून  पत्र व व्यवहार करूनही सिडकोकडून दुर्लक्ष केला जात आहे. तसेच वसाहती अवजड वाहनास बंदी घालावी. या विषयी सात दिवसात योग्य तो निर्णय न घेतल्यास   मनसे स्टाईलने आंदोलन केला जाईल. आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सिडको प्रशासन जबाबदार असेल असे पत्र मनसेच्या शिष्टमंडळाने सिडको आणि उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले. या शिष्टमंडळात मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दळवी, पनवेल तालुका उपाध्यक्ष राकेश भोईर तसेच मनसे सैनिक    दिलीप चव्हाण , विकास शिंदे , मिलिंद खाडे  गजेंद्र राठोड, अरुण पळसकर सहभागी झाले होते. 
 
       नव्याने विकसित होत असलेल्या तळोजा वसाहती वाढत्या विकासामुळे लोकसंख्येत भर पडत असून  रस्त्याची दुरावस्था झाली आहे.त्यात  फेज दोन मध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वाहन तपासणी केंद्र असल्यामुळे वसाहतीत अवजड वाहनांची वर्दळ असते. तसेच परिसरात बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे रेती,खडी आणि विटा वाहनांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे.दरम्यान  सिडकोकडून रस्ते डांबरीकरणचे काम केले जाणार आहे.
डांबरीकरणाचे  काम करून जनतेच्या पैशाची नासाडी करू नका.  त्या ऐवजी रस्त्याचे आर सी सी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घ्यावे.  तसेच पेंधर फाटक अवजड वाहनांना बंदी घालावी. लहान वाहनासाठी स्वतंत्र्य रस्ता तयार करण्यात यावा. पेंधर उड्डाण पुलाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करावे. तळोजा फेज एक वसाहती लगत भुयारी मार्गात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या दूर करावी, वसाहतीत मैदान, उद्यान, शाळा, महाविद्यालय, भाजी मंडईसाठी ठेवण्यात आलेल्या भूखंड सभोवती तारकुंपण करण्यात यावे.
 
तसेच वसाहती मधील उद्यानात मध्यपीचा अड्डा बनला आहे. मध्यपीवर कारवाई करण्यात यावी.अश्या मागणीचे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने सिडकोचे कार्यकारी अभियंता मिलिंद म्हात्रे, उपप्रादेशीक विभागाचे  मुख्य सहाय्यक परिवहन अधिकारी  निलेश धोटे आदी ठिकाणी निवेदन देवून सात दिवसात योग्य उत्तरे न दिल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सिडको जबाबदार अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे. पावसाळ्या नंतर सिडकोकडून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सिडको काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध मनोरंजात्मक, व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन