वाहन चालक दिनानिमित्त जनजागृती

नवी मुंबई ः वाहन चालक दिनानिमित्त परिवहन आयुवत अविनाश ढाकणे यांनी संपूर्ण राज्यातील मोटार ट्रेनिंग स्कूल चालकांना केलेल्या
आवाहनानुसार सारथी सुरक्षा सेवा संस्था आणि युवा सेवा फाऊंंडेशन यांच्या माध्यमातून विनय मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या सहकार्याने १७ सप्टेंबर रोजी सीबीडी-बेलापूर वाहतूक पोलीस चौकीजवळ रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी सीबीडी उड्डाणपुलाखालील सिग्नल वर २०० सेकंद थांबणारा सिग्नलची निवड करुन तेथे रस्ता सुरक्षा जनजागृती त्याचबरोबर वाहतूक चिन्हांविषयी प्रश्न-उत्तर विचारुन वाहन चालकांना भेटवस्तू त्याचबरोबर जे वाहनचालक नियमांचे पालन करताना दिसले, त्यांना गुलाबाचे फुल आणि ज्यांच्याकडे हेल्मेट नव्हते अशा काही वाहन चालकांना मोफत हेल्मेट देखील वाटप करण्यात आले. रस्त्यावरील अपघातामध्ये मोठ्या व्यवतीमत्वांचा मृत्यू झाल्यास त्यावर चर्चा होते. पण, सर्वसामान्य नागरिक रस्ते अपघातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मृत्युमुखी पडल्यानंतर देखील कुठेही त्याची चर्चा होत नाही. खरे तर प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घरातील अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळेच रस्त्यावरील अपघात कमी होण्याच्या दृष्टीकोनातून सातत्याने सारथी सुरक्षा सेवा संस्था या विषयांमध्ये काम करीत आहे. विशेषतः अपघातातील मृतांमध्ये युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शाळा आणि कॉलेज स्तरावर याविषयी जनजागृती करण्याचे काम युवा सेवा फाऊंडेशन करीत आहे, असे ‘सारथी'चे अध्यक्ष प्रसन्नमार यांनी सांगितले.


याप्रसंगी ‘सारथी'चे ब्रॅन्ड ॲम्बेसेडर तथा विश्वविख्यात जादुगार सतीश देशमुख, सीबीडी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शेलकर, प्रदीप गायकवाड, प्रवक्ता विनय (बंडू) मोरे, पत्रकार चव्हाण, संजय भुरके, सुरेश शिंदे तसेच ‘विनय मोटार ट्रेनिंग स्कूल'चे सर्व सदस्य उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ” या विशेष सेवेची जनसामान्यांमध्ये जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट