नवी मुंबई  जिल्हा  महिला मोर्चा कार्यकारणी नियुक्ति पत्रक वाटप

नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर

नवी मुंबई : महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ चित्रा वाघ तसेच जिल्हाध्यक्ष संदीप गणेश नाईक साहेब यांच्या मान्यतेने नवी मुंबई जिल्हा महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

 जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणीतील सर्व सदस्यांना  नियुक्तीपत्रक प्रदान करण्यात आले  प्रसंगी सर्व महिलांना जिल्हाध्यक्षांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले!     

नवनिर्वाचित सर्व सदस्य यांना अभिनंदन सोबतच आपल्या जबाबदारीनुसार कर्तव्याची जाणीव करून दिली.

भारतीय जनता पार्टी व तमाम पक्षश्रेष्ठींना अभिप्रेत असलेलं कार्य आपल्या सर्वांच्या मार्फत घडो तसेच पक्ष संघटना, ध्येयधोरणे, विचार ,प्रसार  आपल्या सर्वांच्या सहकार्याने वृद्धिगंत होवो, अशा शुभेच्छा,महिला मोर्चा अध्यक्ष सौ माधुरी सुतार यांनी दिल्या .

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नेत्यांवर अर्वाच्य भाषेमध्ये टिका