पनवेल परिसरात वायू प्रदुषणाची समस्या

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून चौकशीची मागणी

नवीन पनवेल : गेले काही दिवस पनवेल महापालिका हद्दीमधील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा, कामोठे, कळंबोली आणि पनवेल या विभागात रात्रीच्या वेळेस केमिकल सदृश्य उग्र वास येत आहे. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. रात्री या सर्व परिसरात भरपूर प्रमाणात उग्र वास येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेले आहे.

गेल्या तीन ते चार दिवसात अवेळी पडलेल्या पावसामुळे रात्रीच्या वेळी गैरफायदा घेऊन हवेत दुषित वायू सोडण्याचे प्रकार वाढलेले आहेत. सध्या आपल्या परिसरात इतर साथीचे रोगही डोके वर काढत आहेत. यापुढे अशा प्रकारच्या केमिकल्स सदृश्य वायू प्रदुषणामुळे श्वसनाचे आजाराचे प्रमाण वाढण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, अशी भिती पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी व्यवत केली आहे.

या संदर्भात प्रितम म्हात्रे यांनी महापालिका विभाग अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पनवेल महापालिकेला  या गंभीर विषयात लक्ष देऊन तात्काळ ठोस पावले उचलून रात्रीच्या वेळी येणाऱ्या या उग्र वासाची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी करणारे पत्राद्वारे केली आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दिवा येथे भीषण पाणीटंचाई