एपीएमसी बाजारात  आफ्रिकन मलावी आंब्याची प्रतीक्षा

नवी मुंबई-: मागील  चार पाच  वर्षापासून  वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात  सरासरी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आफ्रिका येथील मलावी हापूस  आंबा दाखल होत असतो आणि हा आंबा कोकणातील देवगड, रत्नागिरी आंब्यासारखा चवीला गोड असल्याने  हापूसच्या मुख्य हगमाआधीच तीन चार महिने दाखल होत असल्याने या आंब्याला मागणी असते . मात्र त्यामुळे या महिन्यात हा आंबा बाजारात दाखल होणार असल्याने या आंब्याची प्रतीक्षा ग्राहकांना लागली आहे.

हापूस  आंबा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर  कोकणातील रत्नागिरी, देवगड हापूसची चव आठवते. वाशीतील कृषी उत्पन्न बाजारात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात कोकणातील तुरळक हापूस  दाखल होण्यास  सुरुवात होते. तर मार्च , एप्रिलला मुख्य हंगाम जोर पकडतो. मात्र मागील चार पाच वर्षांपासून हापूसच्या हंगामाआधीच  नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात  एपीएमसी बाजारात आफ्रिकेतील मलावी आंबा दाखल होतो. मागील वर्षी हापूस ४० टनहुन अधिक दाखल झाला होता.  दहा वर्षांपूर्वी  काही शेतकऱ्यांमार्फत रत्नागिरी मधून ४० हजार हापूसच्या काड्या मलावीमध्ये नेवून लागवड करण्यात आलेली आहे.  सुमारे १४०० एकरवर आंब्यांच्या काड्यापासून कलम तयार करून लागवड करण्यात आली होती . आता  त्याला फळधारणा होत असून बाजारात  हा मलावी आंबा दाखल होत आहे. हापुसला उष्ण दमट हवामान लागते, नोव्हेंबरमध्ये आफ्रिका मलावी मधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला चांगली  फळधारणा होते .  तर आफ्रिका मलावी आंबा या महिनाभरात कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या फळ बाजारात दाखल होणार असल्याची माहिती फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे. त्यामुळे  हापूस सारख्याच चवीचा आंबा लवकरच दाखल होणार असल्याने या आंब्याची चव येथील ग्राहकांना  चाखायला मिळणार असून आंब्याची प्रतीक्षा लागली आहे.

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत