राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत 

पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत कलामंथन ठाणे संस्थेच्या "फ्लाईंग राणी " ने बाजी मारली. करंडकाचे विजेतेपद पटकावून बहुमानाचा अटल करंडक आणि ०१ लाख रुपये बक्षिसाचे ते मानकरी ठरले. 

      माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या करंडक उत्सवात ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा सन्मानचिन्हमानपत्रशालश्रीफळ व ५० हजार रुपये असे स्वरूप असलेल्या 'गौरव रंगभूमीचा' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.   
 
        अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने हि एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप हे होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (दि. ०४) रात्री शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. 
 
           यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, प्रसिद्ध लेखक, निर्माते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, अभिनेते, लेखक व दिग्दर्शक अभिराम भडकमकर, अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक विजय गोखले, स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर विनोदी कलाकार पृथ्वीक प्रताप, अभिनेते भरत साळवे, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर सीता पाटील, चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत,  माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील, युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहराध्यक्ष रोहित जगताप, ऍड. चेतन जाधव, अभिषेक भोपी, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, स्पर्धा सचिव व नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, अमोल खेर, चिन्मय समेळ, गणेश जगताप, अक्षया चितळे, संजीव कुलकर्णी, वैभव बुवा, निखिल गोरे, उमेश वाळके, प्रतीकेश मोरे, ओमकार सोष्टे आदी उपस्थित होते .
 
      नाटय चळवळ वॄद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावेत्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावेतसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावायासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूरमहापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. रंगमंच आमचा... कलाविष्कार तुमचा” हे ब्रीद वाक्य घेऊन  गेली १५ वर्ष पनवेल मध्ये एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आधी सात वर्ष ही स्पर्धा मल्हार करंडक” या नावाने जिल्हास्तरीय स्वरूपात आयोजित केली जात होती. त्यानंतर या स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि राज्यभरातून नवोदित कलाकारांची मागणी लक्षात घेता. हि स्पर्धा राज्यस्तरीय झाली.  नामवंतउमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजनआकर्षक पारितोषिकेदर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 
Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

आगीवरील तेल कंपन्यांची तयारी तपासण्यासाठी ऑफ साइट मॉक फायर ड्रिल प्रात्यक्षिकांचे आयोजन