शेल इंडियाच्या कामगारांना दरमहा २३ हजार रुपयांची पगारवाढ 

शेल इंडिया मार्केट्स प्रा. लिमिटेड मधील कामगारांना पगारवाढ

पनवेल : शेल इंडिया एम्प्लॉईज संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदशनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना ऐतिहासिक बोनस देणाऱ्या तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट्स प्रा. लिमिटेड मधील कामगारांच्या पगारवाढीचा व सुविधा देण्याचा करार पार पडला. तीन वर्षांसाठी झालेल्या करारानुसार कामगारांना प्रत्येक महिना २३ हजार रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली असून याचा ७० कामगारांना फायदा होणार आहे. 

 या करारानुसार पगारवाढीसोबत कामगारांना ४० हजार रुपये फेस्टिव्हल अडव्हान्स, अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, ०५ लाख रुपयांचा मेडिक्लेम विमा, याशिवाय रजा, शिफ्ट अलाउन्समध्येही वाढ करण्यात आली आहे.तसेच कामगारांसाठी वातानुकूलित बस सेवा, उन्हाळ्याच्या दिवस एनर्जी ड्रिंक, अशाही सुविधा देण्यात येणार आहेत.  यंदाच्यावर्षी दिवाळी बोनस म्हणून प्रत्येक कामगाराला तब्बल ९५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. विशेष हि बाब येथेच थांबली नाही तर पुढच्या वर्षी ०१ लाख ०५ हजार तर त्याच्या पुढील वर्षी ०१ लाख १५ हजार रुपये कामगारांना बोनस मिळणार आहे.  या कराराबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामगारनेते जितेंद्र घरत आणि टीमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 

या पगारवाढीच्या करारावर संघटनेच्यावतीने अध्यक्ष जितेंद्र घरत, व्यवस्थापनाच्या वतीने मार्केटिंग व्यवस्थापक गुलशन चौधरी, एच आर व्यवस्थापक शशांक शेखर, उत्पादन निर्मिती व्यवस्थापक सागर करुळकर,  कामगार प्रतिनिधी रामदास गोंधळी, सुनिल पाटील, जयराज जाधव, यासिन शेख, अनिल पावशे, सुनिल हरिचंद्रकर, यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी संघटनेच्या कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, विनायक मुंबईकर, संघटक विनायक कोरडे, तळोजा एमआयडीसी मधलं डाऊ केमिकल, हायकल, दीपक नायट्रेड, केमस्केप यासह शेल इंडियाचे कामगार उपस्थित होते. 

 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

नमुंमपा प्रारुप विकास आराखडा