महिला सक्षमीकरणाबाबत शालेय अभ्यासक्रमात संबंधित कायदे व अधिकारांचा समावेश करावा

भाजपच्या माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे लेखी मागणी

ठाणे : देशातील महिला वर्ग व तरुणी सक्षम नागरिक बनव्यात,त्यांना सुरक्षितता, त्याचबरोबर महिलांविषयीच्या कायद्यांचे ज्ञान तरुणी, महिला तसेच तरुणांना  विद्यार्थी दशेत यावे यासाठी राष्ट्रीय स्तरावरून केंद्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षणात यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने विचार व्हावा अशी मागणी माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा एका कार्यक्रमासाठी ठाण्यात आल्या असता नंदा पाटील यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,मोदी सरकारच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. सरकारच्या महिला विकास धोरणामुळे महिला वर्गात समाधानाची भावना आहे. महिलांना सरकार कडून अपेक्षा आहेत.

देशातील महिला वर्ग व तरुणी सक्षम नागरिक बनव्यात,त्यांना सुरक्षितता, त्याचबरोबर महिलांविषयीच्या कायद्यांचे ज्ञान तरुणी, महिला तसेच तरुणांना  विद्यार्थी दशेत यावे यासाठी राष्ट्रीय स्तरावरून केंद्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षणात यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने विचार व्हावा अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू झाल्यास विद्यार्थी दशेतच महिलांबाबत आदर,महिलांबाबतचे कायदे याची माहितीही विद्यार्थ्यांना मिळेल. महिलांवर होणाऱ्या अन्याय,अत्याचार याबाबत अभ्यासक्रम निर्माण झाल्यास येणारी पिढी ही अधिक जागृत बनेल.कायद्याच्या माहितीमुळे व धाकामुळे मुली, महिला,तरुणी यांच्यावरील अत्याचार कमी होण्यास मदत होईल. अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यास सामान्य महिलाही सक्षम होतील असे नंदा कृष्णा पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे.

आदर्श समाज घडवण्याच्या दृष्टीने महिला सक्षमीकरण आवश्यक असून महिलांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी प्रशिक्षित समाज घडवणे आवश्यक आहे.त्या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमात महिलां बाबतचे कायदे, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात असणारे कायदे, महिला सक्षमीकरणाचा समावेश करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा अशी मागणी नंदा कृष्णा पाटील यांनी केली आहे.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल तालुवयात लवकरच अखंडित वीज पुरवठा