इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे स्तनाच्या व गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर (कर्करोग )तपासणी शिबीर संपन्न

उरण येथे कर्करोगाचे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

उरण : इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय उरण येथे महिलांच्या कॅन्सर रोगाविषयी जनजागृती व्हावी तसेच महिलांना कॅन्सर सारखा घातक व जीवघेणा रोग होऊ नये या अनुषंगाने कॅन्सर सारख्या जीवघेण्या रोगावर अगोदरच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कॅन्सरचा (कर्करोगाचे )मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरामध्ये एकूण २७ महिलांची तपासणी करण्यात आली.रुग्णालयातील हे पहिलेच असे कॅन्सर तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते. असे शिबीर नियमितपणे ठेवण्यात येणार असून २० ते २५ बचत गट किंवा इतर रुग्णालयाशी संपर्क साधून त्यांची मोफत तपासणी करून देण्यात येईल. सदर कॅन्सर शिबीर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. बी. एम. कालेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. स्वाती म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी,हेमा म्हात्रे,संजीवनी म्हात्रे, संगिता, हिरा यांनी विशेष प्रयत्न केले. सदरची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून प्रशिक्षण घेउन करण्यात आले. महिला वर्गांनी घाबरून न जाता स्तनाचा व ग‌र्भाशय मुखाचा कॅन्सर तपासणी साठी पुढे यावे. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नाव नोंदणी करावे असे आवाहन वैदयकीय अधिक्षक डॉ. बी. एम. कालेल यांनी केले आहे.

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' उपक्रमाचा शुभारंभ