सीवुडस्‌ मध्ये सातत्याने कोसळताहेत घरांच्या स्लॅबचे प्लास्टर

नवी मुंबई ः ‘नेमेची येतो पावसाळा अन्‌ नेमेची निखळतात घरांच्या स्लॅबचे प्लास्टर' अशी सीवुडस्‌ मधील सिडको वसाहतींची अवस्था झाली आहे. सीवुडस्‌, सेवटर-४८ मधील प्रियदर्शनी सोसायटीतील घराच्या छताचे प्लास्टर कोसळण्याची घटना घडून एक दिवस उलटून जात नाही तोच याच सेवटर मधील सुखसागर सोसायटीतील घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली आहे. सदर दुर्घटनेमुळे ‘सिडको'निर्मित घरांच्यानिकृष्ट बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला असून सिडको प्रशासन आता फवत नागरिकांच्या मरणाची वाट बघत आहे का? असा संतप्त सवाल सीवुडस्‌ मधील सिडको वसाहतीतील रहिवाशांनी व्यवत केला आहे. सीवुडस्‌, सेवटर-४८ मधील ‘सिडको'च्या प्रियदर्शनी सोसायटीतील डी-३९ इमारतीतील घर क्र.४ मध्ये राहणारे सुरेश बुरुंगळे यांच्या घरातील किचनच्या छताचे प्लास्टर निखळून पडल्याची घडना ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ च्या सुमारास घडली.  सुदैवाने यावेळी किचनमध्ये काेणीही नसल्याने जीवितहानी टळली गेली. परंतु, सिडको निर्मित घरांच्या निकृष्ट बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट'चे जिल्हाप्रमुख विल मोरे, उपशहरप्रमुख सुमित्र कडू, विभागप्रमुख समीर बागवान, शाखाप्रमुख विशाल विचारे, संतोष दळवी, अनिल पाटील, विनायक पुकाळे आदि पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच जोपर्यंत सिडको निर्मित घरांची पुनर्बांधणी हाती घेतली जात नाही तोपर्यंत ‘सिडको'ने दुरुस्तीची कामे चालू ठेवण्याची मागणी करीत ‘शिवसेना'चे पदाधिकारी लवकरच ‘सिडको'च्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, प्रियदर्शनी सोसायटीतील घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडून एक दिवस उलटत नाही तोच ८ नोव्हेंबर रोजी सीवुडस्‌, सेवटर-४८ मधील ‘सिडको'च्या सुखसागर सोसायटीतील सी-११इमारतीतील रुम क्र.२ मधील हॉलच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे सिडको प्रशासन आता फवत नागरिकांच्या मरणाची वाट बघत आहे का? असा संतप्त सवाल सीवुडस्‌ मधील रहिवाशांनी व्यवत केला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पोलीस दलातील 6 पैकी 5 उपायुक्तांच्या एकाचवेळी बदल्या