दिवाळी पूर्वीच या कंपनीतील ४० कामगारांची दिवाळी

शेल इंडिया कंपनी मधील कामगारांना ९५ हजार रुपये बोनस

पनवेल ः तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठी ‘दिवाळी बोनस'चा आगळावेगळा आणि भूतो न भविष्यती करार झाला आहे. या करारानुसार यंदा दिवाळी बोनस म्हणून शेल इंडिया कंपनी मधील प्रत्येक कामगाराला तब्बल ९५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. तर पुढील वर्षी १ लाख ५ हजार तर त्याच्या पुढील वर्षी १ लाख १५ हजार रुपये बोनस कामगारांना मिळणार आहे.शेल इंडिया कंपनी मधील कामगारांना यंदा ९५ हजार रुपये बोनस मिळवून देण्याची किमया आमदार प्रशांत ठाकूर आणि कामगारनेते जितेंद्र घरत यांनी साधली आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीच या कंपनीतील ४० कामगारांची दिवाळी झाली आहे.  

तळोजा औद्योगिक वसाहतीत शेल इंडिया लिमिटेड नामक ऑइल कंपनी आहे. या ठिकाणी पूर्वी कामगार काँग्रेस कामगार संघटना कार्यरत होती. मात्र, कामगारांनी आपल्या न्यायिक हक्कासाठी ‘शेल इंडिया एम्प्लॉईज युनियन'चे आधारवड म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या तर अध्यक्ष म्हणून कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या कार्याला पसंती दिली. देशातील सर्वात मोठा असलेला दीपावली सण एक महिन्यावर आला आहे. दिवाळी बोनस कामगारांचा नेहमीच जिव्हाळ्याचा प्रश्न राहिला आहे. त्या अनुषंगाने सदर संघटनेकडून कंपनी व्यवस्थापनाला बोनस मागणीचे पत्र देऊन चर्चा घडविण्यात आली. या चर्चेत कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय घ्ोत कामगार आणि कंपनी हिताचा निर्णय घ्ोतला. दिवाळी बोनस करारामुळे शेल इंडिया कंपनी मधील कामगार वर्गात आनंदाचे वातावरण असून, त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते जितेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत.

दिवाळी बोनस करारावर कामगार संघटना तर्फे अध्यक्ष जितेंद्र घरत, शेल इंडिया कंपनी व्यवस्थापन तर्फे मार्केटिंग व्यवस्थापक गुलशन चौधरी, एच.आर. व्यवस्थापक शशांक शेखर, उत्पादन निर्मिती व्यवस्थापक सागर करुळकर, संघटना सचिव समीरा चव्हाण, कामगार प्रतिनिधी रामदास गोंधळी, सुनिल पाटील, जयराज जाधव, यासिन शेख, अनिल पावशे, सुनिल हरिचंद्र यांनी सही केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर गाव हे माझे घर आहे आणि यासाठी मी नेहमी काम करायला तयार - आ. मंदाताई म्हात्रे