एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात एकूण ६३ अवैध वाहनांवर कारवाई करून परवाना रद्द

वाशी आरटीओची  ६३ अवैध स्कूल बसेसवर  कारवाई 

वाशी ः नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी स्कूल बस चालवल्या जात आहेत. परंतु, स्वूÀल बस चालवताना अनेक वाहन चालक कागदपत्रांची पूर्तता न करताच स्वूÀल बस चालवत आहेत. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न करताच धावणाऱ्या स्वूÀल बस वाहनांवर ‘आरटीओ'ची करडी नजर असून, वाशी आरटीओ द्वारे तपासणी करुन एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात एकूण ६३ अवैध ‘स्वूÀल बस'वर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये ‘स्वूÀल बस'चा परवाना रद्द करण्यात आला आहे.

कोविड काळात गेली दोन वर्ष बंद असलेल्या शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ऑफलाइन सुरु झाल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींची ने-आण करणाऱ्या स्कूल बसेस देखील सुरु झाल्या आहेत. मात्र, यातील बऱ्याच स्वूÀल बस नियमांना बगल देत चालवल्या जात असल्याचे समोर येत आहे. अलिकडेच खारघर येथे एका ‘स्कूल बस'ला लागलेल्या आगीच्या घटनेने स्कूल बसेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘स्वूÀल बस'ची नोंदणी, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक, वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, चालकाची परवाना बॅच यांची तपासणी करण्यात येणार असून, यामध्ये विशेषतः वाहन परवाना आणि वाहन योग्यता प्रमाणपत्र, अग्निशमन यंत्रणा यांची कटाक्षाने तपासणी आरटीओ द्वारे व्ोÀली जाणार आहे. एप्रिल ते ऑगस्ट-२०२२ या पाच महिन्यात ‘आरटीओ'ने नियमांना बगल देत रस्त्यावर धावणाऱ्या ६३ स्वूÀल बस वाहनांवर कारवाई करुन ८५ हजार रुपये दंड वसुल केला आहे. तसेच काहींचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळी पूर्वीच या कंपनीतील ४० कामगारांची दिवाळी