गरीब विद्याथ्यांनाही उच्च वैद्यकीय शिक्षण मिळावे याकरिता मेडिकल कॉलेजची आवश्यकता- आ. मंदाताई म्हात्रे

सीबीडी येथे शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्याबाबतचा मार्ग मोकळा

नवी मुंबई: सिबीडी सेक्टर-15ए येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या भूखंडाचा सिडकोने नवी मुंबई महापालिकेला लावलेला रु.107 कोटींचा दर हा 50% ने कमी करण्यात यावा, याकरिता बेलापूर च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून सदर भूखंडाचा दर 50% ने कमी करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे सीबीडी  येथे शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्याबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे.

 25 वर्षात जे झाले नाही ते नवी मुंबईकरांना प्रतीक्षा असलेला निर्णय झाल्याने त्यांना दिलासा मिळाला असून सर्व स्तरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांजसह सदरबाबत सहकार्य करणाच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी व नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आमदार म्हात्रे यांनी मानले.

नवी मुंबई क्षेत्रात शासकीय मेडिकल पदवी कॉलेज उभारल्याने स्थानिक विद्याथ्र्यांना त्याचा लाभ होणार असून सामान्य व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी हे पात्रता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहत असल्याने त्याचाही फायदा विद्याथ्र्यांना उच्च वैद्यकीय शिक्षण मिळण्याकरिता होणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, सर्वसामान्यांना मोफत दरात आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्या तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्यांनाही अल्पदरात मेडिकल पदवी शिक्षण मिळावे याकरिता सिबीडी
सेक्टर-15ए येथे शासकीय हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहे.

सदर भूखंडाचा सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेला लावलेला रु.107 कोटींचा दर हा 50% ने कमी करण्यात यावा, याकरिता माझा सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र
फडणवीस यांनी सदर भूखंडाचा दर हा 50% ने कमी करण्याचा निर्णय घेतला.

नवी मुंबई क्षेत्रातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून उपचाराकरिताबेड्स उपलब्ध होत नाहीत. ठाणे, कल्याण, उरण, पनवेल, कर्जत, खोपोली तालुक्यातील रुग्णही उपचाराकरिता नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याने नवी मुंबईतील स्थानिक रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने उपचाराविना मृत्यू होण्याची संख्याही वाढत आहे. नवी मुंबईसारख्या विकसित शहरात अशा परिस्थितीचा सामना करण्याकरिता योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याने शासकीय सुपरस्पेशालीस्ट हॉस्पिटल उभारणे काळाची गरज आहे.

कोव्हीद काळात याची उणीव प्रकर्षाने जाणवली. तसेच नवी मुंबई क्षेत्रात एकही शासकीय मेडिकल पदवी कॉलेज नसल्याने स्थानिक विद्याथ्यांना खाजगी कॉलेज किंवा नवी मुंबई बाहेरील कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाकरिता जावे
लागत आहे. तसेच सामान्य व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी हे पात्रता बसूनही आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

गरीब विद्याथ्यांनाही उच्च वैद्यकीय शिक्षण मिळावे, याकरिता नवी मुंबईमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याची आवश्यकता आहे. सिडकोने महापालिकेला लावलेला दर हा कमी झाल्याने लवकरच हॉस्पिटल व मेडिकल पदवी उभारण्यात
येणार आहे, असे आ. मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात एकूण ६३ अवैध वाहनांवर कारवाई करून परवाना रद्द