नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातर्फे अनेक अत्याधुनिक सुविधा प्रवाशांकरिता उपलब्ध

एनएमएमटी बस प्रवाशांची कॅशलेस प्रवासाकडे वाटचाल

वाशी ः आजमितीस ‘सोशल मीडिया'च्या जमान्यात बहुतेक व्यवहार कॅशलेस पध्दतीने सुरु आहेत. नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) तर्फे देखील कॅशलेस व्यवहाराची सुविधा सुरु करण्यात आली असून, त्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात २ लाख ८७ हजार प्रवाशांनी ऑनलाइन बुकिंगला पसंती दिली. त्यामुळे ‘एनएमएमटी'चे पेपरलेस तिकीटांचे उद्दिष्ट साध्य होत आहे

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातर्फे अनेक अत्याधुनिक आणि स्मार्ट सुविधा प्रवाशांकरिता उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ‘एनएमएमटी'ने वातानुकूलित बस, प्रत्येक बस थांब्यावर बसेस आणि त्यांची वेळ, घरबसल्या तिकीट बुक करण्यासाठी ॲप अशा विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. याशिवाय ‘एनएमएमटी'चे पेपरलेस तिकीट उद्दिष्ट ठेवून प्रवाशांना आता कॅशलेस प्रवास करता यावा यासाठी प्रवासी वर्गाला फायदेशीर ठरणारे फोन पे, क्युआर कोड स्कॅनिंग यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना कॅशलेस व्यवहार करुन तिकीट उपलब्ध होत असून, यामुळे कित्येकदा उदभवणारी सुट्या पैशांची चणचण देखील सुटत आहे. ‘एनएमएमटी'ची ऑनलाइन तिकिट बुकिंग सुविधा कोरोना काळात २०२० मध्ये सुरु करण्यात आली. त्यावेळी ‘कोविड'चा संसर्ग टाळण्यासाठी ‘एनएमएमटी'ची ऑनलाइन तिकिट बुकिंग प्रणाली सुरु करण्यात आली.  मागील वर्षी ऑगस्ट-२०२१मध्ये ५५ हजार प्रवाशी ऑनलाइन तिकिट बुकिंग सुविधा वापरत होते. मागील वर्षभरात यामध्ये वाढ होऊन आजमितीला २ लाख ८७ हजार प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट बुकिंग केली आहेत.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतूक विभागाची कुठलीही परवानगी न घेता तीन ते चार तास सार्वजनिक रस्ता बंद