१९ सप्टेंबर रोजी डॉ मनिष पाटील यांचे सिडको कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

दिघोडे,वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील नूकसान ग्रस्त रहिवाशांचे सिडकोसमोर उपोषण

उरण : सिडको प्रशासनाने दिघोडे,वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील नूकसान ग्रस्त रहिवाशांना दोन वर्षांचा कालावधी लोटत आल्या नंतर ही भरपाईचा मोबदला दिला नाही. सिडकोच्या मनमानी कारभारा विरोधात तसेच नूकसान ग्रस्त रहिवाशांना आर्थिक मोबदला मिळावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा रायगड जिल्हा परिषदेचे मा.सदस्य डॉ मनिष पाटील यांनी सिडको कार्यालयासमोर सोमवार दि १९ सप्टेंबर रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी रायगड, सिडको,उरण तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा रायगड जिल्हा परिषद मा.सदस्य डॉ मनिष पाटील नमूद केले आहे की १७ डिसेंबर २०२० रोजी नवीमुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी दिड मिटर व्यासाची जलवाहिनी ( पाईप लाईन) दिघोडे ग्रामपंचायत हद्दीत फुटली होती.सदर फुटलेल्या जलवाहिनी ( पाईप लाईन) मधिल पाण्याच्या प्रवाहाने परिसरातील रहिवाशांच्या राहत्या घराचे व व्यावसायिकांच्या दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तसेच रस़्त्यावरील वाहने वाहून गेल्याची घटना घडली होती.

 

  या अपघातात रहिवाशी, प्रवाशी नागरीक थोडक्यात बचावले होते.या घटनेचे गांभीर्य ओळखून नूकसान ग्रस्त रहिवाशांच्या घरांचे, व्यवसायिकांच्या दुकानाचे पंचनामे हे महसूल विभागाचे अधिकारी आणि दिघोडे ग्रामपंचायतीने तातडीने केले होते.आणि तशा प्रकारचा अहवाल सिडकोकडे सादर ही करण्यात आला .यावेळी सिडकोकडून नूकसान ग्रस्त रहिवाशांना, व्यावसायिकांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.परंतू नूकसान ग्रस्त रहिवाशांकडून सातत्याने पाठपुरावा करून ही आजतागायत सिडकोकडून रहिवाशांना आर्थिक मदत देण्यात आली नाही.सिडकोच्या विरोधात तसेच नूकसान ग्रस्त रहिवाशांना सिडको कडून आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी सोमवार दि १९ सप्टेंबर २०२२ रोजी सिडको कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा डॉ मनिष पाटील यांनी दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी