आर्य समाज ,वाशी यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव

विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे - राज्यपाल  भगतसिंह  कोश्यारी

ठाणे : प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड निवड ही वेगवेगळी असते. त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावेअसे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी  यांनी आज येथे केले.

            आर्य समाज ,वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये कोश्यारी बोलत होते. यावेळी राजस्थानमधील खासदार स्वामी सुमेधानंद सरस्वतीविवेकानंदजी परिव्रजकराजकुमार दिवाण,धर्मवीर शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी हिंदी विषयामध्ये प्राविण्य मिळवलेल्या नेरुळ येथील डी .ए.व्ही पब्लिक  स्कूलचे विद्यार्थी नमन ठाकूर,कुमार दिव्यम झावंशिका चंद,सान्वी शरणतसेच वाशीच्या फादर अग्नेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी सिध्देश रुपेश काळे,  वाणी कौर चोपरावाशी इंग्लिश हायस्कूलचे विद्यार्थी आर्यन कृष्णप्रसाद,एपीजे स्कूल नेरुळच्या संहिता रंगराजनएपीजे स्कूल नेरुळच्या विद्यार्थी अनंतजीत पांडेडी .ए.व्ही. पब्लिक  स्कूलपनवेलच्या विद्यार्थीनी ईशा जाधव यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

            राज्यपाल कोश्यारी म्हणाले की,आपण सर्वांनी शिक्षित होऊन सुसंस्कृत होणे गरजे आहे.आपण किती ही मोठे झालो तरी आपल लक्ष भारतमातेकडे असणे गरजे आहे. महाराष्ट्रात सर्वांना हिंदी भाषा समजते. हिंदी भाषेचा कोणताही प्रचार न करता विस्तार होत आहे. ही भाषा सर्वांना जोडण्याचे काम करते. त्याबरोबरच आपण राहत असलेल्या महाराष्ट्रातील मराठी भाषा शिकणे गरजेचे आहेअसेही कोश्यारी यावेळी यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘डेब्रिज'वर प्रकिया करुन पेव्हरब्लॉक निर्मिती