ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील ‘पलेमिंगो शिल्पाकृती'ला राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र

‘नवी मुंबई'चा पुन्हा राष्ट्रीय गौरव

नवी मुंबई ः शहर सुशोभिकरणामध्ये टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर या संकल्पनेचा अत्यंत प्रभावी वापर करण्यात आला असून नवी मुंबई शहरातील अनेक चौकांमध्ये टाकाऊ वस्तंुचा वापर करुन आकर्षक शिल्पाकृती साकारण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्ग नजिक नेरुळ, सेक्टर-२६ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून २८.५ फुट इतक्या उंचीची भव्यतम पलेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आलेली आहे. या अत्यंत भव्य स्वरुपात साकार झालेल्या शिल्पाकृतीची विशेष नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌' या विविध क्षेत्रातील विक्रम नोंदविणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महापालिव्ोÀला याबाबतचे राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌'चे परीक्षक बी.बी. नायक यांनी टाकाऊ धातुंच्या यंत्रभागांद्वारे बनविलेली देशातील सर्वात उंच शिल्पाकृती (ऊीत्तेू एम्ीीज् शूीत् एम्ल्त्ज्ूल्ीा स्ी्‌ा दि श्ीम्प्ग्हा झ्ीीूे) असा मजकूर असलेले राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र आणि पदक महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे प्रदान केले.

स्वच्छतेमध्ये नेहमीच मानांकन उंचविणारे शहर असा नवी मुंबईचा नावलौकिक असून नागरिकांच्या सहभागातून नवी मुंबई शहरात सातत्याने नानाविध उपक्रम राबविले जात असतात. स्वच्छतेमधील थ्री आर अशी संकल्पना प्रभावीपणे राबविण्याकडे महापालिकेने विशेष लक्ष दिले असून या अंतर्गत कचरा निर्मितीत घट (Rा्‌ल्म), टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर (Rाल्ेा) आणि कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया (Rाम्ब्म्त) करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने टाकाऊतून टिकाऊ अंतर्गत महापालिव्ोÀने सर्वात उंच टाकाऊ धातुंच्या यंत्रभागाद्वारे बनविलेली आकर्षक अशी पलेमिंगोची शिल्पाकृती ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे उभारली आहे.

अनेक समुद्र ओलांडून नवी मुंबईत येणारे रोहीत पक्षी (पलेमिंगो) नवी मुंबई शहराचे आकर्षण स्थान आहे. नवी मुंबईच्या खाडीकिनारी वर्षातील दीर्घकाळ वास्तव्य करणारे पलेमिंगो पक्षी बघण्यासाठी पर्यटक, पक्षीप्रेमी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून महापालिकेने नवी मुंबई शहराची ‘पलेमिंगो सिटी' अशी ओळख दृढ करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत शहरात ठिकठिकाणी पलेमिंगोची आकर्षक भित्तीचित्रे साकारण्यात आली असून अनेक ठिकाणी पलेमिंगोच्या शिल्पाकृती बसविण्यात आलेल्या आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीत बॉयलर इंडिया प्रदर्शनाला सुरुवात