खारघर मधील रस्त्यावर पडलेल्या खडयांमुळे नागरिक हैराण

रस्त्याची कामे करा - काँग्रेस सिडकोला निवेदन

खारघर : खारघर सेक्टर तीस मधील रस्त्यावर पडलेल्या खडयांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सिडकोने परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे असे निवेदन खारघर शहर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता गिरीश राघूंवशी याना दिले आहे. 

 खारघर सेक्टर तीस ओवा गाव तसेच सिडको वसाहत हा परिसराचा समावेश होतो. परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. वसाहती मधील अंतर्गत रस्त्याची दैयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे. पदपथाची दुरावस्था झाली आहे.  बुधवार ता. सात रोजी खारघर शहर काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मुसादिक मोडकउपाध्यक्ष अभिजित मुंडाकल व सदस्यांनी गिरीश रघुवंशी यांची भेट घेवून निवेदन दिले.तसेच   सेक्टर 27 पासून सेक्टर 36 पर्यंतच्या रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली. खारघर सेक्टर चौतीस पस्तीस परिसरात दोन वर्षांपूर्वी महानगर गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस जोडणीसाठी रस्त्यावर हा खोदकाम केले होते. मात्र सदर रस्त्याचे काम सिडकोकडून करण्यात आले नाही. त्यामुळे मोठया प्रमाणात खड्डे पडले आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचतात त्यामुळे वाहन चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहे. तर काही  ठिकाणी रस्त्यावर  गतिरोधकांची उंची अधिक आहे . पदपथावरील झाकणे गायब झाली आहे. त्यामुळे पदपथावर पायी चालताना गटारात पडून अपघात होवू शकतो, सिडको अधिकाऱ्यांनी  प्रथम पाहणी करून त्यानांतर तातडीने काम करावे असेही शिष्टमंडळाने रघुवंशी यांना  सांगितले. मोडक म्हणाले पावसाने विश्रांती घेताच  खारघरच्या सेक्टर 30 मधील  रस्त्याच्या काम हाती घेणार  असल्याचे आश्वासन  सिडको अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ध्वनी प्रदुषण करणाऱ्या मंडळांवर होणार कारवाई