नवी मुंबई शहरात सातव्या विसर्जन दिनी २९३७ श्रीमुर्तींचे विसर्जन

‘गणपत्ती बाप्पा मोरया'च्या गजरात बाप्पाला भक्तीमय निरोप

नवी मुंबई ः श्री गणेशोत्सवातील विसर्जनाच्या सातव्या दिवशी नवी मुंबई महापालिकेने सर्व विभागांमध्ये निर्माण केलेल्या केलेल्या कृत्रिम तलावांना पसंती देत महापालिका क्षेत्रामध्ये २७८९ घरगुती आणि १४८ सार्वजनिक अशा एकूण २९३७ श्रीमुर्तींचे विसर्जन सुव्यवस्थितरित्या संपन्न झाले. यामध्ये २२ पारंपारिक मुख्य विसर्जनस्थळांवर १६०४ श्रीगणेशमुर्तींचे तर १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर १३३३ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. नवी मुंबई मधील मुख्य २२ विसर्जन स्थळांमध्ये बेलापूर विभागातील ५ विसर्जन स्थळांवर २२६ घरगुती आणि ८ सार्वजनिक,

नेरुळ विभागात २ विसर्जन स्थळी ३६१ घरगुती आणि ४३ सार्वजनिक, वाशी मधील २ विसर्जन स्थळांवर १२२ घरगुती आणि ८ सार्वजनिक, तुर्भे विभागात ३ विसर्जन स्थळांवर २३९ घरगुती आणि २३ सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात २ विसर्जनस्थळी १२६ घरगुती आणि २५ सार्वजनिक, घणसोली मध्ये ४  विसर्जन स्थळांवर २३७ घरगुती आणि २० सार्वजनिक, ऐरोली विभागात ३ विसर्जन स्थळी ८७ घरगुती आणि ५ सार्वजनिक तर दिघा विभागात १ विसर्जन स्थळावर ६६ घरगुती आणि ८ सार्वजनिक अशाप्रकारे १४६४ घरगुती आणि १४० सार्वजनिक मिळून १६०४ श्री गणेशमुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.

त्याचप्रमाणे बेलापूर ते दिघा अशा आठही विभागातील एकूण १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर बेलापूर मधील १६ कृत्रिम विसर्जन स्थळी १९, नेरुळ विभागात २४ स्थळांवर ४७ घरगुती, वाशी मधील १६ स्थळांवर ३५ घरगुती, तुर्भे विभागात १७ स्थळांवर १७० घरगुती आणि ८ सार्वजनिक, कोपरखैरणे मध्ये १५ स्थळांवर ३०६ घरगुती, घणसोली मधील १८ स्थळांवर ४३८ घरगुती, ऐरोलीमध्ये १६ स्थळांवर १८८ घरगुती तर दिघा विभागातील ९ विसर्जन स्थळांवर १२२ घरगुती श्रीगणेशमूर्ती, अशाप्रकारे १३२५ घरगुती आणि ८ सार्वजनिक अशा एकूण १३३३ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सर्व विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्या सह स्वयंसेवकांची तसेच मुख्य विसर्जन स्थळांवर लाईफ गार्डस्‌ची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यासोबतीने अग्निशमन विभाग आणि आरोग्य विभागाचेही पथक कार्यरत होते. सर्व विसर्जन ठिकाणी नवी मुंबई पोलिसांची दक्षतेने नजर होती.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मधील रस्त्यावर पडलेल्या खडयांमुळे नागरिक हैराण