संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाशी आणि सीबीडीतील वाहतुकींमध्ये बदल

अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाशी आणि सीबीडीतील वाहतुकीत मोठया प्रमाणात बदल  

नवी मुंबई : वाशी शहरातील श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांची संख्या मोठी असल्याने तसेच या मिरवणुका वाशी सेक्टर-17 मधील शिवाजी चौकातून विसर्जन स्थळाकडे जात असतात. त्याचप्रमाणे सीबीडीतील गणपती विसर्जनाच्या मिरवणुका या भाऊराव पाटील चोकातुन आग्रोळी गाव तलावात जात असतात. या दोन्ही ठिकाणीअनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाशीतील तसेच सीबीडीतील वाहतुकींमध्ये मोठया प्रमाणात बदल केले आहेत. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वाहतुक विभागाने अधिसूचना जारी केली आहे.  

अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाशी तसेच आजुबाजुच्या परिसरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणपती मोठÎा प्रमाणावर वाशीतील जागृतेश्वर तलावात विसर्जनासाठी शिवाजी चौक, सेक्टर-17 मार्गे जात असतात. त्यामुळे वाशीतील शिवाजी चौकाच्या दिशेने येणारी आणि चौकातून जाणारी वाहतूक तसेच विसर्जन मिरवणुकीतील वाहने यामुळे शिवाजी चौकात मोठÎा प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतुक विभागाकडुन अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाशीतील शिवाजी चौकामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी घोषित करण्यात आली आहे. 

 विसर्जनाच्या दिवशी करण्यात आलेल्या वाहतुकीतील बदलामुळे इतर वाहनांसाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. ऐरोली कोपरखैरणेकडून वाशी शहरात जाणाऱया वाहनांसाठी ब्ल्यु डायमंड सिग्नल चौक ते कोपरी सिग्नल वरुन पामबीच मार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. तसेच वाशी रेल्वे स्टेशन तसेच वाशी हायवेवरुन, मुंबई बाजुकडून वाशी शहरात जाणा-या वाहनांसाठी वाशी फ्लाझा हायवे बसस्टॉप वरुन पुढे डावीकडे वळण घेऊन खाली उतरून पाम बीच मार्गे महात्मा फुले चौक, अरेंजा सर्कल, कोपरी सिग्नल वरुन जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.  

वाशी प्रमाणेच सीबीडीतील आग्रोळी येथील तलावात सार्वजनिक व घरगुती गणपतीचे विसर्जन होत असते. या विसर्जन तलावात बेलापुर गाव, सेक्टर-11 व 15 मधील सर्व घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाचे गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी जात असतात. तसेच विसर्जन झाल्यानंतर त्याच मार्गाने जात असतात. गणेश भक्त विसर्जनासाठी लहान मोठÎा वाहनांचा वापर करत असल्याने या विसर्जनस्थळी मोठÎा प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सीबीडीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते दक्षिणेस सेक्टर-15 कडे जाणारा रोड व सेक्टर-15 कडुन उड्डाणपुलावरुन कर्मवीर भाऊराव पाटील चौकाकडे येणारा रोड हा गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंद करण्यात आला आहे.  

सीबीडीतील वाहतुकीतील बदलामुळे इतर वाहनांसाठी दिवाळे जंक्शन ते भाऊराव पाटील रस्ता, रेल्वे स्टेशन सेक्टर-11 मार्गे आपल्या निश्चित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. गणपती विसर्जनामुळे विविध ठिकाणच्या मार्गामध्ये काही प्रमाणात बदल केल्याने वाहन चालकांनी वाहतुकीतील बदलाची नोंद घेऊन त्यानुसार आपली वाहने चालवून वाहतूक विभागाला सहकार्य करावे असे आवाहन वाहतुक नियंत्रण विभागाचे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नवी मुंबई शहरात सातव्या विसर्जन दिनी २९३७ श्रीमुर्तींचे विसर्जन