कोपरखैरणेतील दुतर्फा वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर

नवी मुंबई --: कोपरखैरणे परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्क होत असल्याने रोज वाहतूक कोंडी होत असते. तर या वाहतूक कोंडीमुळे परिवहन बसेसचा देखील खोळंबा होत असल्याने वाहतूक विभागाच्या शिफारशींने  येथील बस मार्ग एनएम्एमटीने बदलले आहेत. त्यामुळे या भागात रस्त्याच्या दुतर्फा पार्क होत असलेल्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करावी अशी मागणी आगरी काेळी युथ फाउंडेशन ऐरोली विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे विभाग हे अत्यंत दाटीवाटीचा परीसर म्हणून परिचीत आहे. मात्र, याभागात वाढती लोकसंख्या आणि वाहन संख्या पाहता येथील रस्त्यांचे नियोजन पुरते फसल्याचे येथील वाहतूक कोंडीवरून दिसून येत आहे. या भागात सेक्टर,१४,१९, ६ आणि कोपरखैरणे रेल्वे स्थानक समोरील रस्त्यावर नेहमीच बेजबाबदार पणे रस्ताच्या दुतर्फा वाहन पार्क केली जातात. आधीच अरुंद रस्ते आणि ही वाहन पार्किंग त्यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे.तर सेक्टर २२ आणि २३ मध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील बस मार्ग ४ आणि ८ च्या वाहतुकीत बदल करावा म्हणून वाहतूक विभागाने एनएम्एमटीला शिफारस केली आणि एनएम्एमटीने या बस मार्गात बदल देखील केले. मात्र सदर बस मार्ग बदल्याने याठिकाणी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मोठी पायपीट करावी लागते. त्यामुळे चोर सोडून सन्यशाला शिक्षा देत असल्याचा आरोप करत येथील रस्त्यावरील दुतर्फा वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली तर कायम स्वरुपी तोडगा निघेल .म्हणून वाहतूक विभागाने अशा वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी आगरी काेळी युथ फाउंडेशन ऐरोली विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाशी आणि सीबीडीतील वाहतुकींमध्ये बदल