युवा प्रेरणा सामाजिक संस्था वतीने गेल्या बारा वर्षांपासून टाटा हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीराचे आयाेजन

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान शिबीर चांगला उपक्रम - आयुक्त गणेश देशमुख 
 
खारघर : एका व्यक्तीने रक्तदानामुळे केल्यामुळे व्यक्तींना जीवदान  मिळते. त्यात युवा प्रेरणा सामाजिक संस्था गेल्या बारा वर्षांपासून टाटा हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या कॅन्सरग्रस्त  रुग्णांसाठी  तेही दहा वर्षांपासून  रक्तदान शिबीर घेवून  आगळा वेगळा उपक्रम घेवून स्वातंत्र दिन साजरा करीत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे पालिका आयुक्त  गणेश देशमुख यांनी सांगितले. या शिबिराला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी भेट देवून माजी नगरसेविका नेत्रा पाटील आणि   युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.  
 
     युवाप्रेरणा सामाजिक संस्था व माहेश्वरी प्रगती मंडळ ,खारघर यांच्या वतीने आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे हे बारावे वर्षे आहे. या शिबिरात 81 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. तसेच यावेळी परिसरातील  नागरिकांसाठी सानपाडा येथील साईदृष्टी ॲडव्हान्स सेंटर फॉर परफेक्ट व्हिजन  हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी नेत्रतज्ञ राजपाल उसनाळे यांनी  डोळ्यांची तपासणी करून  डोळ्या संबंधित आजारांबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना  माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि पालिका  आयुक्त गणेश देशमुख  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून   गौरविण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी  युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील, दिलीप जाधव, भरत कोंढाळकर, कुणाल देवकर, गोपाल राजपूत, संदीप ठाकरे, ललित बडोदेकर,आदित्य हाटगे तसेच माहेश्वरी प्रगती मंडळाचे जय डागा, आशीष मनीयार, सतीशजी मुंदड़ा, मंगेशजी सिकची ,अमित भांगड़े , सचिन सोनी, आशीष शारदा, डॉ राकेश सोमानी, गीतेष कोठारी सोमन मालाणी यांनी  मेहनत घेतली.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकातर्फे कचरा वर्गीकरणाचे १०० टक्के लक्ष्य