एपीएमसी बाजारात कांदा बटाट्याची दरवाढ

कांदा बटाट्याची आवक कमी आणि मागणीत वाढ झाल्याने घाऊक बाजारात उसळी

नवी मुंबई-:वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार आवारात कांदा बटाट्याची आवक कमी आली असून मागणीत वाढ झाल्याने शनिवारी घाऊक बाजारात बटाटा दराने चार ते पाच  व कांद्याने दोन ते तीन रुपयांनी उसळी घेतली.बाजारात ६३ गाड्या बटाटा व ९३ गाड्या कांदा आवक झाली असून बटाटा,२४ ते २५ रू प्रतिकीलो  तर कांदा १६ ते १८ रू  पोहोचला होता.

एपीएमसी बाजार आवारात उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यातून रोज बटाटा आवक.होत असतो.मात्र आगामी येणाऱ्या सलग तीन दिवस सुट्ट्या पाहता बाजारात शेतकरी वर्गाने बटाटा कमी पाठवला.तर सध्या श्रावणात  मोठ्या प्रमाणात शाकाहार केला जातो. तसेच येणारे सण पाहता कांदा बटाट्याच्या मागणीत वाढ होत आहे.मात्र आवक कमी आणि मागणी जास्त त्यामुळे शनिवारी बाजारात बटाट्याच्या दराने चार ते पाच.रुपयांची उसळी घेतली एक दिवस आधी बटाटा १८ ते १९ रू प्रतिकीलो जात होता मात्र शुक्रवारी  घाऊक बाजारात २४ ते २५ दर होता.हीच अवस्था कांद्याची असून कांद्याच्या दरात २ ते ३ रुपयांनी वाढ झालेली असून उच्च प्रतिचा कांदा १६ ते १८ रू.व मध्यम कांदा १२ ते १४ रू प्रतिकिलो.विकला गेला.तर लसणाचे दर देखील १० रू वाढले असून  लसूण ७० ते ९० रू प्रतिकीलो  विकला गेला आहे.तर अगामी गणेशोस्तव सण पाहता कांदा बटाटा मागणीत आणखी वाढ होणार असल्याने दरात  आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती  कांदा बटाटा व्यापाऱ्यांनी   दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

युवा प्रेरणा सामाजिक संस्था वतीने गेल्या बारा वर्षांपासून टाटा हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीराचे आयाेजन