९६ सदनिकांचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत पूर्ण

नवी मुंबई ः ‘सिडको'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली जगप्रसिध्द प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन ९६ सदनिका असणाऱ्या १२ मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. याद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वांसाठी घरे असे उद्दिष्ट जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने ‘सिडको'ने गृहनिर्माण क्षेत्रात इतिहास रचला आहे. ‘सिडको'तर्फे परिवहन केंद्रीत विकास संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महागृहनिर्माण योजनेचे काम हाती घ्ोण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडस्‌मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटांसाठी सदनिकांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

सिडकोने ‘मिशन-९६' अंतर्गत कमीत कमी वेळात बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले होते. त्यानुसार कंत्राटदार मे. लार्सन ॲन्ड टुब्रो यांनी बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासह सुरक्षित आणि मजबूत घरे बांधण्याकरिता प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करुन ९६ सदनिका असणाऱ्या १२ मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी सुरु झालेले १२ मजली इमारतीचे बांधकाम ९ जुलै २०२२ रोजी पूर्ण करण्यात आले. यामुळे रेरा कायद्यातील वेळेत बांधकाम पूर्ण करण्याच्या मानकाचेदेखील अनुपालन करण्यात आले आहे.


‘मिशन-९६'च्या निमित्ताने नियंत्रित वातावरणात, मजला बांधणीचा कालावधी कमी करण्यासह कमी मनुष्यबळाच्या उपलब्धतेसह उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यासाठी प्रीकास्ट तंत्रज्ञान किती सक्षम असल्याचे सिध्द झाले आहे. प्रीकास्ट तंत्रज्ञान भविष्यात सर्वोत्तम गुणवत्तेसह नियंत्रित वातावरणात यांत्रिक पध्दतीने निवासी इमारतींचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. सदर बांधकामामध्ये वास्तुशास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण (फिनिशिंग) करण्यासह अधिसंरचनेच्या (सुपरस्ट्रक्चर) १,९८५ प्रीकास्ट घटकांचे उत्पादन (प्रॉडक्शन) आणि प्रतिष्ठापन (इन्स्टॉलेशन) करणे आणि ६४,००० चौरस फुट बांधीव क्षेत्रावर यांत्रिक, विद्युत, नळकाम विषयक कामे (एमईपी) करण्याचा समावेश होता. बांधकाम तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बांधकामाच्या प्रगतीवर देखरेख करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.


गृहनिर्माणातील सदर यशासह ‘सिडको'ने नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घ्ोऊ इच्छिणाऱ्या हजारो कुटुबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे घरांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित झाली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज करिता भूखंड सवलतीच्या दराने देण्यास सिडको अनुकूल -आ.मंदाताई म्हात्रे