95 कर्मचा-यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

    मे 2021 पासून वर्षभरात 467 अधिकारी, कर्मचा-यांना आश्वसित प्रगती योजनेचा लाभ

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेमार्फत दर्जेदार सेवासुविधा उपलब्ध करून देताना याकामी योगदान देणा-या   महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींकडेही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडून आस्थेने लक्ष दिले जात आहे.

          त्या अनुषंगाने मागील वर्षभरात 33 संवर्गातील 372 अधिकारी, कर्मचारी यांना 3 लाभांच्या सुरक्षित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आज अग्निशामक या संवर्गातील 75 कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ लागू करण्यात आला आहे तसेच कक्षसेवक या संवर्गातील 17 कर्मचाऱ्यांना दुसरा लाभ लागू करण्यात आला आहे.

          याशिवाय फिल्ड केमिस्ट, लॅब केमिस्ट, सहाय्यक लॅब केमिस्ट या संवर्गातील प्रत्येकी 1 याप्रमाणे 3 कर्मचाऱ्यांना तीन लाखांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ लागू करण्यात आलेला आहे.

          अशाप्रकारे मे 2021 पासून एकाच वर्षात एकूण 467 कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.

          सहाव्या वेतन आयोगानुसार 12 व 24 व्या वर्षी मिळणारे आश्वासित प्रगती योजनेचे 2 लाभ आता सातव्या वेतन आयोगानुसार 10 व्या, 20 व्या व 30 व्या वर्षी असे 3 लाभांच्या स्वरूपात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार मिळत असून तशा प्रकारची मान्यता आयुक्त अभिजीत बांगर यांनी 8 मे 2021 रोजी देऊन यामध्ये निकषात बसणा-या कर्मचा-यांना ते लवकरात लवकर द्यावेत असे निर्देश दिले होते. त्यानुसार पदोन्नती समितीच्या नियमित बैठका होत असून त्याचा आढावा आयुक्तांमार्फत घेतला जात आहे. त्यानुसार आज 95 कर्मचा-यांना 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू करण्यात आलेला आहे.

          याशिवाय नुकत्याच 120 अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नत्या करण्यात आलेल्या असून मागील दीड वर्षात 33 संवर्गातील 290 अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नत्या करण्यात आलेल्या आहेत.

         त्यामध्ये पदोन्नती समितीने शिफारस केल्यानुसार आज आणखी 2 कर्मचा-यांची भर पडलेली असून  उपलेखापाल / लेखा परीक्षक या संवर्गातून सहाय्यक लेखाधिकारी / सहाय्यक लेखा परीक्षा अधिकारी या उच्च संवर्गामध्ये 2 कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये एक दिव्यांग कर्मचारी आहे.

           वर्षभराच्या कालावधीत आजच्या 95 कर्मचा-यांसह एकूण 467 अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आलेला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तसेच 2 कर्मचा-यांसह मागील दीड वर्षात एकूण 292 अधिकारी, कर्मचारी यांना दिलेल्या पदोन्नत्या  यामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीआरझेड  वरील भूखंड वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांची मानवी साखळी