खारघरमध्ये सिडकोकडून  रस्ते दुरुस्तीचे काम सुरु  

खारघर :   खारघर वसाहती मधील रस्त्यावर पावसाने पडलेले खड्डे, पदपथ दुरुस्ती आणि रस्त्यावरील उघडे मॅनहोल वर झाकण लावण्याचे काम सिडकोने हाती घेतल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. 
 
   खारघर वसाहती मधील रस्ते,पदपथ आणि उघड्या मॅनहोलवर झाकण बसविण्याच्या कामासाठी सिडकोने  तीन कोटी रुपये खर्च करून ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र खारघर मध्ये पालिकेकडून कामाच्या ठिकाणी फलक लावून  खड्डे बुजवली जात होती, सिडकोकडून  खारघर मधील रस्ते, पदपथ आणि मॅनहोलच्या दुरुस्तीचे काम हे श्री राम कंट्रक्शन या एजन्सी कडून केले जात आहे. मात्र सिडकोकडून कोणत्याही प्रकारचे फलक लावले जात नसे, त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम हे पालिकेकडून केले जात असल्याचा समज नागरिकांमध्ये होता. श्री राम कंट्रक्शन एजन्सीकडून  जून महिन्यापासून रस्ते आणि पदपथाची कामे सुरु आहे.  पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे, पदपथ आणि उघडे मॅनहोल आदी कामासाठी चार टीममध्ये जवळपास चाळीस कामगार विविध सेक्टर मध्ये काम करीत आहे. त्यात पेव्हर ब्लॉक,मॅनहोल वरील झाकण बसविणे आणि  खड्डे बुजवण्यासाठी  कोल्डमिक्सचा वापर केला जात आहे. तसेच पावसाळ्यात कुठेही पाणी साचू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.
 
खारघर वसाहत पालिकेकडे हस्तांतरण झाली आहे. मात्र या वर्षी सिडकोने खारघर मधील रस्त्यावर पडलेले खड्डे, मॅनहोल दुरुस्ती आदी कामे सिडकोने करावे असे ठरले आहे. मात्र पावसाळ्यात  खारघर मधील काही रस्त्यावर खड्डे पडले आहे, तर काही दिवसापूर्वी खड्ड्यात पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेला आहे. त्यामुळे रस्त्यावर  खड्डे असल्याची तक्रार नागरिकांनी पालिकेकडे केल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे.  त्यानुसार खड्डे बुजवताना पालिकेचा फलक असल्याचे  नागरिकांना दिसत आहे. मात्र सिडकोने तीन कोटी रुपये खर्च करूनही सिडकोचा  उल्लेख होत नाही. त्यामुळे यापुढे खारघरमध्ये  सिडकोकडून  कामे सुरु असलेल्या ठिकाणी सिडकोचे फलक लावण्यात यावे अशी सूचना सिडकोने ठेकेदारांना देण्यात आली आहे. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमधील पुनर्प्रकियाकृत पाणी उद्योग समुहांना पुरविण्याची कार्यवाही महिन्याभरात सुरू कऱण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश