महिलांसाठी विशेष पर्वणी!
|
नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सहकार्याने श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, आर.सी.एफ. आणि मिती क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३ वाजता पामबीच सानपाडा, सेवटर-१७ मधील वडार भवन येथे ‘उत्सव पाककलेचा-उत्सव खाद्यसंस्कृतीचा...श्रावण महोत्सव-२०२२'चे आयोजन करण्यात आले आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील महिलांसाठी सदर विशेष पर्वणी असून ‘श्रावण महोत्सव'ची प्राथमिक फेरी सुरु होणार आहे. प्राथमिक फेरीचा विषय चविष्ट कटलेट आणि स्वादिष्ट सूप असून स्पर्धक कोणत्याही प्रकारचे कटलेट आणि कोणत्याही प्रकारचे सूप करु शकतात. सदर पदार्थ स्पर्धकांनी घरीच बनवून आणावयाचे असून त्याची मांडणी स्पर्धेच्या ठिकाणी करण्याचे आणि पदार्थाच्या सजावटीसाठी खाद्यपदार्थ वापरण्याचे निर्देश नियमावलीमध्ये सांगण्यात आलेले आहेत. तसेच स्पर्धकांनी बनविलेल्या पदार्थांची कृती सोबत लिहून आणावी. पदार्थाची चव, सजावट आणि पौष्टिकता यावर स्पर्धेचा निर्णय अवलंबून राहणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम मानला जाणार आहे.
|