‘वंदेमातरम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांमुळे परिसर देशभक्तीमय

कोंकण भवन येथे समूह राष्ट्रगीत गायन


नवी मुंबई ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत १७ ऑगस्ट रोजी कोकण भवन येथे उपआयुक्त मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.


याप्रसंगी उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमूख, उपायुक्त (पुरवठा) रवि पाटील, उपायुक्त (रोहयो) वैशाली राज चव्हाण (निर्धार), उपायुक्त (करमणूक) सोनाली मुळे, उपआयुक्त (वस्तू-सेवा कर) कमलेश नागरे, नगररचनाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे, विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ तसेच विविध कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन-सांस्कृमिक कार्य विभागाने   काढलेल्या शासन निर्णयानुसार १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोकण भवन इमारतीत असलेल्या सर्व कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोकण भवन इमारतीच्या प्रांगणातील ध्वजस्तंभाजवळ मोठया संख्येने उपस्थित राहून समूह राष्ट्रगीत गायन केले.


समूह राष्ट्रगीत गायना नंतर वंदे मातरम्‌ आणि भारत माता की जय या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे कोकणभवन इमारतीचा परिसर देशभक्तीमय झाला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईकरांनी सक्रिय सहभागी होत यशस्वी केला 'समूह राष्ट्रगीत गायन' उपक्रम