छत्रपती शिवाजी महाराजांचे जलधोरण

रायगडावर शिवाजी महाराजांनी एकूण ८ तलाव बांधले. येथे आजही मुबलक पाणी उपलब्ध आहे. बहुतांश किल्ल्यांवर खडक फोडून तळी बांधली. रायगडावरील गंगा सागर तलाव हा शिवकालीन सर्वात मोठा तलाव आहे. अलिबाग येथील समुद्रातील खडकावर कुलाबा व सर्जेकोट हे दोन किल्ले बांधले. भरतीच्या वेळी कुलाबा किल्ल्याच्या चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडतो आणि ओहोटी सुरू होताच किल्ल्यापर्यंत जमीन उघडी पडते. हा शिवकालीन चमत्कार आजही आपण पाहू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत जवळपास ३५०किल्ले होते. सह्याद्री पर्वतरांगात असलेल्या सर्व किल्ल्यांत तळी आणि पाण्याची टाकं बांधलेली आहेत.

विश्ववंदनीय  स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा. तसेच रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून विधिवतपुजा करून तिला जनमान्यता मिळ्‌वून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, रामायण महाभारतातील कथा महाराजांना सांगून त्यांचे देश प्रेम वृद्धिंगत करणाऱ्या कणखर बाण्याच्या राष्ट्रमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा. १९ फेब्रुवारी  १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. कमी वयात जास्त समज असलेल्या छत्रपती  शिवाजी महाराजांना आपला शत्रू कोण हे ओळखता आले. म्हणतात ना, जेव्हा निश्चय पक्का असेल तेव्हा डोंगरही मातीच्या ढिगाऱ्यासारखा भासेल.  या उक्तीप्रमाणेच शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहीले ते स्वराज्य निर्मितीचे.

स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. त्यांनी मावळ्यांची उत्कृष्ट फौज निर्माण केली आणि स्वराज्य निर्मितीचा पक्का निश्चय करून ते प्रत्यक्षात आणले. हे स्वराज्य टिकवण्यासाठी कमी मनुष्यबळ असताना गनीमी काव्याने औरंगजेब व त्यांच्या सरदारांना सळो की पळो केले. काही किल्ले काबीज केले तर काही तहाच्या रूपाने गमावले. गड काबीज करण्यासाठी जिवाभावाची माणसे गमावली. हे सर्व स्वराज्य निर्माण करून ते टिकवण्यासाठी महत्त्वाचे होते. शेतकरी रयतेसाठी लोक कल्याणकरी योजना राबवल्या. शिवाजी महाराज उत्तम प्रशासक तर होतेच शिवाय ते पराकोटीचे समाज सेवकही होते. महाराष्ट्रात एकूण ९ हजार ४०० धरणे आहेत. त्यातील तब्बल ३२ धरणे छत्रपती शिवाजी महाराजांनी  खेड शिवापूरसहित  शेतकऱ्यासाठी बांधली. १६५६ मध्ये शिवापूर - खेड येथे पहिले धरणशिवाजी महाराजांनी बांधले. या धरणाने आज पर्यंत शेती व लोकांची तहान भागवली आहे. दुसरे धरण शिवरायांनी पुण्या जवळील कोंडवे येथे बांधले. रयतेसाठी प्रत्येक गडावर स्वच्छ पाण्याची सोय तर केली; पण सोबतच शेतकरी राजा जगला पाहिजे ही भावना नेहमी त्यांनी जपली.

 रायगडावर शिवाजी महाराजांनी एकूण ८ तलाव बांधले. येथे आजही मुबलक पाणी उपलब्ध आहे. बहुतांश किल्ल्यांवर खडक फोडून तळी बांधली. रायगडावरील गंगा सागर तलाव हा शिवकालीन सर्वात मोठा तलाव आहे. अलिबाग येथील समुद्रातील खडकावर कुलाबा व सर्जेकोट हे दोन किल्ले बांधले. भरतीच्या वेळी कुलाबा किल्ल्याच्या चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडतो आणि ओहोटी सुरू होताच किल्ल्यापर्यंत जमीन उघडी पडते. हा शिवकालीन चमत्कार आजही आपण पाहू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे राजे होते, त्यांच्या अखत्यारीत जवळपास ३५०किल्ले होते. सह्याद्री पर्वतरांगात असलेल्या सर्व किल्ल्यांत तळी आणि पाण्याची टाकं बांधलेली आहेत. ज्यातील पाण्यामुळे सैनिक आणि प्रजा यांची गरज भागत होती. महाराजांनी निसर्गाच्या विरोधात जाऊन काही केलं नाही. पाण्याची टाकं बांधून, तळी बांधून पावसाचं पाणी त्यात साठेल अशी सोय केली. महाराजांनी गडावरील सैन्याची आणि पायथ्याकडील रयतेची पाण्याची सोय करून ठेवली होती, तेही निसर्गाच्या सहाय्याने...त्यांनी बांधलेली किल्ल्यांवरील तळी आणि टाकं यातील काही आजही शाबूत आहेत.

शिवाजी महाराजांनी अनेक धरणे बांधली असतील; परंतु त्याचा साधा उल्लेख इतिहासकारांनी करू नये, हे या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव होय. आजही दुष्काळ निवारण करण्यासाठी शिवकालीन जलनीती वापरली जाते. महाराष्ट्रात कितीही मोठा दुष्काळ पडला तरी शिवकालीन किल्ल्यावरील तळी, पाण्याची टाकं यातपाणी असतं. यातून त्यांची वैचारिक विचारांची बैठक किती होती ही बाब स्पष्टहोते.आजही तीनशे पंचाहत्तर वर्षात त्यांचे विचार आदर्शवादी ठरतात. आज आपण पाहतो की, महाराष्ट्रातील जनतेला शिवाजी महाराजांबद्दल खूप आदर आहे. त्यांच्या प्रत्येक ऐतिहासिक घटनांना आज महत्व प्राप्त झाले आहे. सामाजिक वराजकीय दृष्ट्या शिव जयंती, शिव राज्याभिषेक, त्यांचा स्मृतिदिन ई. बाबी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात युवक वापरला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतले जात आहे. ही बाब निश्चितचचांगली नाही.

या कल्याणकारी योजना आखताना स्वराज्यात लोकशाही व न्याय व्यवस्था प्रभावीपणे राबवली. यातून हे स्पष्ट होते की, शिवाजी महाराज फक्त पराक्रमी होते असे नव्हे तर ते चरित्र संपन्न व्यक्तिमत्व होते. आज स्वराज्याचे सुराज्य करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण लोकशाही टिकवली पाहिजे. लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्रावरील आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊसारख्या न्यायाधीश तयार होण्याची गरज आहे. -डॉ. श्रीकृष्ण दि. तुपारे प्राध्यापक आ. प्र. वि. महाविद्यालय, नागोठणे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कॉपीची कुप्रथा