सर्व सामान्य रुग्णांची लूट थांबवा, शितल कचरे यांची मागणी

नवी मुंबई -: नवी मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पीटलमध्ये अंधाधुंद कारभार सुरू असून गोर गरीब रुग्णांना बाहेरून औषधी साहित्य आणावे लागत असल्याने नाहक भुर्दंड बसत असून ही एक प्रकारे लूट आहे. त्यामुळे ही लूट तात्काळ थांबवावी अशी मागणी  शिवसेनेच्या नवी मुंबई महिला शहर संघटक शितल सुर्यकांत कचरे  यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका रूग्णालयात रूग्णांची नाहक आर्थिक पिळवणुक होत आहे. रूग्णालयात रूग्णांना लागणारी सिरीज, वेनप्लो, हॅडग्लोज, डायपर तसेच अनेक औषधे बाहेरून आणावयास रूग्णांच्या नातेवाईकांना सांगीतले जाते. सरासरी प्रति दिवस २०० ते ५००० रूपये खर्च आहे. परंतु रूग्णालयात सर्व औषध व उपचाराकरीता लागणारे साहित्य पालिकेने पुरविणे गरजेचे आहे असे असताना गरीब सर्वसामान्य जनतेकडुन हि नाहक लुट कशाकरीता केली जाते असा सवाल कचरे यांनी केला आहे. तर या बाबत २ ते ३ महिने  अगोदर वारंवार तोंडी तकारी केलेल्या असून देखील मनपा आयुक्तांनी दखल  घेतल्याने कचरे यांनी नाराजी व्यक्त करत  सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून रुग्णांची लुटमार थांबवावी अशी मागणी शिवसेनेच्या नवी मुंबई महिला शहर संघटक शितल सुर्यकांत कचरे  यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज वितरीत करा

 नवी मुंबई महानगरपालिकेची शैक्षणिक शिष्यवृत्ती सन २०१९-२० आणि सन २०२-२२ या दोन वर्षाचे शिष्यवृत्तीचे फॉर्म अदयाप सुरू झाले नाहीत. दसरा दिवाळी जवळ आली तरी विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीपासुन वंचित राहावे लागत आहे . त्यामुळे लवकरात लवकर शैक्षणिक शिष्यवृत्तीचे अर्ज वितरीत करावे अशी मागणी शिवसेना नवी मुंबई महिला शहर संघटक शितल सुर्यकांत कचरे  यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजन थेरपी सुरू करा

 नवी मुंबई पालिकेच्या हद्दीत ऑक्सिीजन थेरपी हि उपचार पध्दती सानपाडा येथील खाजगी हॉस्पीटल मध्ये चालु असुन ते खर्चिक आहे. एखाद्या कुटूंबातील कर्त्या पुरुषास अर्धांगवायु सारखा आजार झाल्यास नवी मुंबईतील सर्व सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. तरी हि उपचार पध्दती आपल्या नवी मुंबई पालिकेच्या हॉस्पीटल मध्ये सूरू करावी अशी मागणी कचरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाच महिन्यांपूर्वी केलेल्या कामांच्या सप्टेबरमध्ये निविदा