जागतिक पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन

प्रादेशिक पर्यटन संचालनालय तर्फे पर्यटन दिननिमित्त विविध स्पर्धा
नवी मुंबई ः पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण भवन आणि डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर २०२२ रोजी जागतिक पर्यटन दिन निमित्त सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोविड-१९ महामारीने पर्यटन उद्योगात परिवर्तन घडवून आणण्याची महत्त्वाची गरज अधोरेखित केली आहे. ‘पर्यटनाचा पुनर्विचार' (Rाूप्ग्हव्ग्हु दि ऊदलीग्ेस्) या वर्षाच्या थीमनुसार पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण भवन आणि डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यटन २०२२-टुरिझम फेस्ट' अंतर्गत ट्रॅव्हल फोटोग्राफी स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि पर्यटनाचा पुनर्विचार या विषयावर वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


या स्पर्धांमध्ये नवी मुंबईतील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, अमिटी युनिव्हर्सिटी, ॲपटेक ॲव्हीएशन ॲकॅडमी, आयसीई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, एस. पी. मोरे कॉलेज या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी भाग घ्ोणार आहेत. स्पर्धेत प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थांना कोकण विभागीय आयुक्त यांच्या हस्ते मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत भाग घ्ोणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्ोऊन जागतिक पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन ‘पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय'चे उपसंचालक हनुमंत कृ. हेडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सर्व सामान्य रुग्णांची लूट थांबवा, शितल कचरे यांची मागणी