करावे गांवच्या विकासाचे रेखाचित्र प्रत्यक्षात उतरणार

 

करावे गावातील १० भूखंडावर आरक्षण

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा कार्यान्वित होण्यास २७ वर्षानंतर मुहूर्त मिळाला आहे. महापालिकेची  पहिली विकास योजना प्रशासनाने १० ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिध्द केली होती. यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ६२५ आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. नवी मुंबईतील संगीतप्रेमी आणि उच्च शिक्षित अशी खायटी असणाऱ्या करावे गांवच्या सर्वांगिण विकासासाठी ‘सिडको'च्या भूखंडाची मागणी अनेक वर्षापासून माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आणि माजी नगरसेविका सौ. रेखा म्हात्रे यांच्याकडून करण्यात आली होती. अखेरीस त्यांच्या मागणीला अथक प्रयत्नांती यश आले असून नवी मुंबई विकास योजना-नियंत्रण नियमावलीत जाहिर केलेल्या आरक्षणाप्रमाणे करावे गावासाठी १० भूखंडांवर आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे  करावे गांवच्या विकासाचे सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्या प्रयत्नाना आता यश येणार आहे.


 नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ११० करावे गावातही अनेक भुखंडाचे आरक्षण नसल्याने आणि भूखंडाचा ताबा ‘सिडको'कडे असल्याने त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कोणत्याही सुविधा देता येत नव्हत्या. त्यामुळे सदर भूखंड नवी मुंबई महापालिकेने शहर विकास योजना मध्ये समाविष्ठ करावेत. या भूखंडावर आरक्षण टाकावे, त्याचप्रमाणे प्रारुप विकास योजनेत सुधारणा करावी, अशी मागणी माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी मागील पाच वर्षापासून तत्कालीन महापालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे केली होती. भूखंड विकासाच्या अनुषंगाने ‘सिडको'कडे महापालिकेने पाठपुरावा करावा यासाठी विनोद म्हात्रे यांनी महापालिका सभागृहात प्रशासनाचे लक्ष देखील वेधले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून मागण्यांची पूर्तता करण्यात आल्याचे विनोद म्हात्रे यांनी सांगितले.

करावे गांवच्या सर्वांगिण विकासाच्या अनुषंगाने केलेल्या संपूर्ण मागण्या महापालिका विकास योजना आराखड्यात पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अथांग सागरी किनारा, निसर्गाचे वरदान लाभलेल्या स्थानिक भूमीपुत्रांच्या करावे गांवचा वैविध्यपूर्ण विकास करणे आता शवय होणार आहे. - विनोद विनायक म्हात्रे, माजी नगरसेवक.

करावे गांव लगत होणारी विकास कामे...
प्रभाग क्रमांक ११० करावे गावामध्ये लग्न, साखरपुडा आणि विविध धार्मिक, वैयक्तीक कार्यक्रमांसाठी दोन समाजमंदिर, कै.गणपतशेठ तांडेल मैदानामध्ये विविध क्रीडा प्रकारासाठी इनडोअर स्टेडियम, भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता भारत सरकारच्या मिठागर  जागेवर गावासाठी नवीन जलकुंभ, श्री गणेश तलावा शेजारी ३५० चौरस मीटरचे अद्ययावत मासळी मार्केट, पामबीच रोड लगत १४००० चौरस मीटर भूखंडावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्टस-कामर्स-सायन्स आणि नर्सिंग महाविद्यालय, करावे-पामबीच मार्गालगत संरक्षण खात्याच्या २० एकर मोकळ्या जागेवर समुद्र किनारी समुद्रेश्वर मंदिराजवळील जागेत भव्य सागरी उद्यान (मरीन गार्डन), भूखंड क्रमांक-१६२ सेक्टर-४४ सीवुडस्‌-नेरुळ या ९५० चौरस मीटर जागेवर आरक्षणानुसार बहुउद्देशीय इमारत, पामबीच रोड चाणक्य जेट्टी पर्यंत समुद्र संरक्षक भिंती लगत ६ मीटर रुंद रस्ता आणि ५०० चौरस मीटर भूखंडावर दशक्रिया आणि धार्मिक विधीसाठी शेड तसेच कै.गणपतशेठ तांडेल मैदानालगत असलेल्या २९००० चौरस मीटर मोकळ्या भूखंडावर बहुउद्देशीय मैदान असे विकास प्रकल्प विकास आराखडयानुसार आरक्षित असणार आहेत. भूखंडावर आरक्षण टाकल्यामुळे आणि सदर कामांसाठी बांधकाम खर्च अपेक्षित धरण्यात आल्याने करावे गांवचा सर्वांगिण विकास होण्यासाठी माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे ऐतिहासिक पाऊल पडले आहे 

 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वापिंग मशीनमुळे ठाणे बेलापूर मार्गावर  धुळीचे साम्राज्य