ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन सहलीचे आयोजन

नवी मुंबई : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त पर्यटन संचालनालयमार्फत 60 वर्षापुढील ज्येष्ठ / वरीष्ठ नागरिकांकरिता गणेश दर्शनाच्या विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सहल मुंबई, ठाणे, पुणे, आणि नागपूर या प्रमुख शहारांमध्ये आयोजित करण्यात आली असून दिनांक 1 व 2 आणि 5 ते 7 सफ्टेंबर या कालावधीत  ठाणे शहारातील  तलाव पाली (घंटाळी रोड) आणि वाघबीळ (घोडबंदर रोड) या ठिकाणांहून सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत दररोज दोन बसेस सुटणार असल्याची माहिती प्रादेशिक पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी दिली.  

या विशेष सहलीसाठी प्रथम येणाऱयास प्रथम सेवा प्राधान्य या तत्वावर इच्छुकांची निवड करण्यात येणार असून पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर गुगल फॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर या माहितीची छाननी झाल्यावर 75 रुपये भरण्यासाठी एक क्युआर कोड पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर सदर रक्कम भरले गेल्यानंतर पर्यटकांना भरलेल्या शुल्काचा क्रीनशॉट पाठवावा लागणार आहे. एका सहलीत जास्तीत जास्त 25 ते 30 वरिष्ठ नागरिकांचा समावेश असणार आहे.   

ठाणे शहारातील गांधीनगर येथील शिवसमर्थ मित्र मंडळ, जय भवानी नगर येथील सार्वजनिक उत्सव मंडळ, किसन नगर-3 येथील जनजागृती मित्र मंडळ तसेच किसन नगर-3 मधील सूर्यउदय मित्र मंडळ, खेवरा सर्कल येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, खोपट येथील पंचशील सार्वजनिक मंडळ या नामांकित गणपती मंडळांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या सहलीत व्हिआयपी दर्शन एसी बसमधून प्रवास, अल्पोपहार व पाणी बॉटल, टूर गाईड, आरोग्य सेवक (प्रथमोपचार किट्ससह) इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत.  

पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सहलीच्या नोंदणी करण्यासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर भेट देण्याचे तसेच अधिक माहितीसाठी 9029581601 किंवा 7030780802  क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोकण विभागाचे प्रादेशिक पर्यटन कार्यालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्रीगणेशोत्सव व्यवस्थेची महापालिका आयुक्तांकडून पाहणी