खारघर मध्ये खड्डे बुजविण्याची कामे जोरात, नागरिक समाधानी 

खारघर: सिडकोकडून  खारघर परिसरातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे शास्त्रोक्त पध्दतीने भरण्यास सुरुवात केल्याने गणेशभक्त समाधान व्यक्त करत आहे. 

खारघरच्या प्रवेशद्वार असलेल्या हिरानंदानी कडूनबँक ऑफ इंडियाकडे तर खारघर सेक्टर चार बेलपाडागावाकडून बँक ऑफ इंडिया मार्गे गणेश मंदिर कडे तसेच घरकुल डेली बाजार कडून घरकुल कडे जाणारा रस्ता, तसेच शिल्प चौक,सेक्टर एकोणीस रिलायन्स मॉल आणि पेट्रोल पंप समोरील रस्ता  तसेच सेक्टर अकरा,बारा,तेरा, वीस, आणि एकवीस परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. गणेश उत्सव सुरु होण्यापूर्वी पालिका अथवा सिडकोने खड्डे बुजवावे अशी मागणी होती. मात्र सिडकोने श्रीराम कंट्रक्शन एजन्सीकडून खारघर मधील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात  खड्डे असलेले असलेल्या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले  आहे.तर सततच्या वाहन वर्दळीमुळे खड्डे उखडू नयेत म्हणून त्यावर डांबर टाकण्यात येत आहे.  गणेश उत्सवात खड्ड्यामुळे गणेश भक्तांना त्रास होवू नये म्हणून   खड्ड्यात बारीक खडी टाकून रस्ता बुजविण्यात आला आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतली की बारीक खडीवर डांबर टाकण्यात येत आहे. सिडको अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता पंचवीस कामगार जेसीबी,ट्रक आदी साहित्य समवेत गेल्या तीन दिवसापासुन खारघर परिसरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे.विशेषतः गणेश आगमन आणि विसर्जन रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्यात आले आहे.  मुख्य रस्त्यावर बरोबरच प्रत्येक भागातील प्रत्येक  गल्ली बोळातील अंतर्गत रस्ते अशाच नियोजनातून भरले जाणार असल्याचे  सांगितले. गणेशोत्सवापूर्वी सिडकोने खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्याने  नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन सहलीचे आयोजन