आमदार मंदाताई म्हात्रे यांनी वाटले 25 हजार तिरंगा झेंडे

बेलापूर विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक, विविध गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, महिला मंडळला वाटप

नवी मुंबई :-  १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्ययोध्यांचे स्मरण, नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान अधिक जागविणे याच मूळ उद्देशाने देशाचे समर्थ नेतृत्व करणारे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी "हर घर तिरंगा" हा अभिनव उपक्रम संपूर्ण हिंदुस्तानात साजरा करण्याचे आवाहन केलेले आहे.

आपल्या प्राणप्रिय देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन सर्वांना मोठ्या अभिमानाने साजरा करता यावा यासाठी बेलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दहा हजार तिरंगा झेंडे वाटप केले. बेलापूर मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, विविध गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी - सदस्य , स्वयंसेवक , सामाजिक कार्यकर्ते , तसेच स्वयंसेवी संस्था, महिला मंडळ पदाधिकारी सदस्य आदींना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आग्रोळी येथील कार्यालयातून सुमारे पंचवीस हजार तिरंगा झेंडे वाटप करण्यात आले.


तत्पूर्वी, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातुन भव्य तिरंगा रैली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शिरवणे येथून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी तिरंगा रैलीस सुरुवात केली . यावेळी माजी महापौर जयवंत सुतार , डॉ राजेश पाटील , माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, माजी नगरसेविका माधुरी सुतार , नेरुळमधील जेष्ठ नागरिक , महिला , युवक- युवती सहभागी होऊन तिरंगा रैलीस प्रारंभ झाला. ही रैली मोठ्या जनसमुदायासह भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष करत एनआरआय कॉम्प्लेक्स बेलापूर येथे आली, येथे उपस्थित सर्व नागरिकांच्या भेटीगाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी करत सुसंवाद साधला. नवी मुंबईतील स्वातंत्रसैनिक, देशप्रेमी नागरिक, माजी सैनिक , विविध धर्मीय नागरिक स्वयंप्रेरणेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिरंगा रैलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आ. मंदाताई म्हात्रे यांनी सर्व नागरिकांना तिरंगा झेंडे वाटप केले.

दरम्यान, 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी दहा वाजता एनआरआय पोलीस स्टेशन नवी मुंबई मनपा मुख्यालय समोरून आ. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीतभव्य तिरंगा रैलीस सुरुवात होणार असून यात मोठ्या संख्येने सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे  असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोली येथे विभागीय क्रीडा संकुलासाठी आरक्षित  भूखंड सिडकोने आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल बांधण्यासाठी पालिकेकडे हस्तांतरित करावा