आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत- आ गणेश नाईक 

नवी मुंबई:- नवी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक आदिवासीला घरे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा आमचा उद्देश असल्याचे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी जागतिक आदिवासी दीना निमित्त वाशीत व्यक्त केले. दरवर्षी प्रमाणे यंदाही नवी मुंबई शहरात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संबंधित नवी मुंबईत वास्तव्याला असणाऱ्या आदिवासी बंधवांनी रॅली काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.

   भारतात आदिवासी म्हणून ओळखले जाणारे स्थानिक लोक; अद्वितीय संस्कृती आणि लोक आणि पर्यावरणाशी संबंधित मार्गांचे वारसा आणि अभ्यासक आहेत.  या लोकसंख्येच्या गरजा, त्यांच्या आरोग्याच्या गरजांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी, दरवर्षी  9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो.नवी मुंबईत ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट  कोपरखैरणे येथून निघालेल्या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी आदिवासी बांधवांनी  पारंपरिक वेशभूषा करून जनजागृती केली .सद्ष्णुरची रॅलीचे  विष्णूदास भावे सभागृहात समारोप होत असलेल्या रॅलीने हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे  तर माजी महापौर जयवंत सुतार ,माजी महापौर सुधाकर सोनवणे ,माजी नगरसेवक रमेश डोळे,राजश्री कातकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सदरील कार्यक्रमात वृक्षपूजन व आदिवासी क्रांतीकारकांचे प्रतिमापूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ आदिवासी सांस्कृतिक पथकांचे सन्मानचिन्ह देऊन गौराविण्यात आले . आदिवासी विचारवंत व प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन विद्यार्थी गुणगौरव सोहळा, पदोन्नती आणि सेवा निवृत्ती सत्कार देखील करण्यात आला.यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. रंजना सुपे ,संतोष भरमळ आदी उपस्थित होते.

 

ReplyReply allForward

   
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी वाटले 25 हजार तिरंगा झेंडे