पामबीच मार्गावर रुग्णवाहिका कार्यरत करण्याची मागणी

खारघर : नवी मुंबईतील पामबीच मार्गावर महापालिकेने चोवीस तास रुग्णवाहिका कार्यरत ठेवावी आणि  एनआरआय कॉम्प्लेक्स ते सेक्टर पन्नास बस आगार दरम्यान ओव्हरब्रिज उभारावे असे निवेदन राष्ट्रवादी   काँग्रेस नवी मुंबई विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेलचे वतीने नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना  दिले आहे. 

नवी मुंबईतील पामबीच मार्ग हा वाहन चालकांचा पसंतीचा रस्ता म्हणून सुपरिचित आहे. तथापि या रस्त्यावर  होणारे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे.  तसेच  सिवुड्स नेरुळ सेक्टर पन्नास परिसर ते एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये कामावर तसेच शाळेत जाताना नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत आहे, अपघाताच्या भीती पोटी पालकांना रोज मुलांना शाळेत सोडावयास जावे लागत आहे.  पामबीच  मार्गावर वर्षभरात जवळपास तीस अपघात झाले असून काहींचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यास वेळीच उपचार मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने पामबीच मार्गावर पालिकेने चोवीस तास रुग्णवाहिका कार्यरत ठेवावी आणि  परिसरातील नागरिक आणि विद्यार्थाना ये जा करण्यासाठी एनआरआय कॉम्प्लेक्स ते सेक्टर पन्नास बस आगार दरम्यान ओव्हरब्रिज उभारावे, करावे गावाजवळ स्कायवॉक उभारावे आणि सारसोळे ग्रामस्थांना सेक्टर चार सिग्नल लगत असलेल्या ग्राम देवता दर्शनासाठी जाण्यासाठी स्कायवॉक उभारावे असे मागणीचे निवेदन   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी  महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जागे अभावी स्थानिक मूर्तीकारांच्या व्यवसायाला घर घर