आमदार महेश बालदी यांची यशस्वी मध्यस्थी जेएनपीएतील कंत्राटी कामगारांच्या पगारवाढीला मंजुरी

उरण : आमदार महेश बालदी यांच्या मध्यस्थीमुळे जेएनपीएच्या कंत्राटी कामगारांच्या पगारवाढीला मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल जेएनपीए प्रशासनाचे आभार मानण्यात आले. जेएनपीए बंदरात कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या ९५० कामगारांना गेली २७ महिने पगारवाढ न देणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात जेएनपीए जनरल कामगार संघटनेने दंड थोपटताच जेएनपीए प्रशासन हादरले. येत्या २९ जुलैला बंदची हाक दिली होती व हेकेखोर अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. या वेळी युनियनचे सल्लागार... आमदार महेश बालदी यांनीसुद्धा आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले होते. जेएनपीएचे चेअरमन संजीव सेठी व व्हाईस चे अरमन उन्मेष वाघ यांनाचर्चेस बोलावून कामगारांच्या पगार वाढीच्या प्रस्तावाला मान्यता देत प्रस्तावावर सह्या केल्याने कंत्राटी कामगारांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

येत्या दोन दिवसांत पगारवाढीच्या करारावर सह्या करण्याचे निर्देश जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कामगार नेते सुधीर घरत व सुरेश पाटील यांनी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पामबीच मार्गावर रुग्णवाहिका कार्यरत करण्याची मागणी