ठाणे बेलापूर मार्गावरील डांबरीकरणासाठी आय आय. टी चा अहवाल मागवणार

आय आय टी मार्फत रस्त्याची पाहणी

नवी मुंबई -: १२८ कोटी खर्च करून ठाणे बेलापूर मार्गाचे कोंक्रीटीकरण करण्यात आले आहे. तर रस्त्याची किनार डांबरीकरणाची आहे. मात्र दर पावसाळ्यात या डांबरी रस्त्यावर खड्डे पडत असतात. त्यामुळे यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी आय आय टी मार्फत या रस्त्याची पाहणी करून त्यांच्या अहवालानंतरच या रस्त्याचे सर्फेसिंगचे काम केले जाईल अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आधुनिक शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे आणि याच आधुनिकतेला दळण वळणातून गती मिळावी म्हणून मनपाने शहरभर काँक्रिट रस्त्याचे जाळे विणायला घेतले आहे. त्यात सर्वाधिक लांब असा दिघा ते तुर्भे असा ठाणे बेलापूर मार्गाचा समावेशअसून यावेळी १२८ कोटी खर्च करून काँक्रिटचा  रस्ता तयार केला आहे. तर रस्त्याची एक लेन डांबरी आहे. मात्र दर पावसाळयात या डांबरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार होऊन रस्त्याची अक्षरशः चाळण होते. त्यामुळे हे खड्डे कायम स्वरुपी बंद होण्यासाठी मनपाने एप्रिल महिन्यात रोड सर्फेसींग कामाची निविदा काढली होती. मात्र आताचे खड्डे पाहता या निविदेला स्थगिती देण्यात आली आहे आणि या रस्त्याची पाहणी आता आय आय टीच्या  तज्ज्ञांमार्फत केली जाणार असून त्यांच्या अहवालानुसारच या रस्त्यावरील पुढील काम केले जाईल अशी माहिती ठाणे बेलापूर मार्गाचे कार्यकारी अभियंता संजय खताळ यांनी दिली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुनिल कुरकुटे यांच्या प्रयत्नांना अखेर यश