कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला संघाची घोषणा    

नवी मुंबई ः ८ ऑगस्ट २०२२ पासून इंग्लंडमध्ये कॉमनवेल्थ गेम्स सुरु होत आहे. कॉमनवेल्थ गेम्स करिता भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बर्मिंघम मध्ये तयारी करत आहे. या स्पर्धेकरिता बीसीसीआय कडून भारतीय महिला संघ जाहिर करण्यात आला असून भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरची कर्णधार पदी तर स्मृती मंधाना हिच्याकडे उपकर्णधार पद सोपविण्यात आले आहे.
कॉमनवेल्थ गेम्स-२०२२ स्पर्धा येत्या ८ ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ सामील होणार असल्याचे बीसीसीआयने या अगोदरच जाहिर केले होते. त्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घाोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने नुकतीच निवृत्ती जाहिर केल्यानंतर संघाच्या कर्णधार पदी हरमनप्रीत कौर हिची बीसीसीआय तर्फे निवड करण्यात आली. त्यामुळे हरमनप्रीतला भारती संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. तर भारताची स्टार समालीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिची संघाच्या उपकर्णधार पदी निवड करण्यात आली आहे.


कॉमनवेल्थ गेम्स-२०२२ साठी भारतीय महिला संघः
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, एस. मेघना, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पुजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

औद्योगिक वसाहतीतील आग विझवणारे हात अपुरे