विष्णुदास भावे नाट्यगृहात प्लास्टिक विषयक जनजागृतीपर कार्यशाळा

14 जुलै  रोजी प्लास्टिक वापराबाबत जनजागृतीपर कार्यशाळा

नवी मुंबई : एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची सूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना 12 ऑगस्ट 2021 रोजी जारी केली आहे.

यानुसार 1 जुलै 2022 पासुन एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री आणि वापरावर बंदी असेल. सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम-2016 नियम 4 (2) अन्वये यानुसार 1 जुलै पासून पॉलिस्टीन आणि विस्तारीत पॉलिस्टीरिनसह खालील सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री आणि वापरावर बंदी असेल. 

प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणे, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांडया, प्लास्टिक झेंड, कॅडी, कांडया, आईस्क्रीम कांडया. सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकॉल), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी, जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठी स्ट्रॉ, स्ट्रे, ढवळण्या, स्टिरर्स, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पाकीटांभोवती प्लास्टिक फिल्म गुंडाळणे किंवा पॅक करणे, प्लास्टिकच्या पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी  या बरोबर महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 पासून प्रतिबंधित आहेत. 

 सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स) हॅन्डल असलेल्या व नसलेल्या, कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून),  सर्व प्रकारच्या नॉन - ओव्हन बॅग्स (पॉलिप्रोपिलीन पासून बनविलेले. एकल वापर प्लास्टिकचे उत्पादन - डिश, बाऊल, कंटेनर (डबे) (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजींगकरिता) सदरच्या जाहिर सूचनेव्दारे सर्व उत्पादक, साठवणुकदार, वितरणकर्ता, दुकानदार, ई कॉमर्स कंपन्या, रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक आस्थापना (मॉल, मुख्य बाजार विक्री केंद्र / सिनेमा केंद्र / पर्यटन ठिकाण / शाळा / महाविद्यालय / कार्यालयीन इमारती / रुग्णालय व खाजगी संस्था) तसेच सामान्य नागरिकांना सूचित करण्यात येते की,  सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपरोक्त अधिसूचनेचे उल्लघंन करणाऱ्यांचा माल जप्त करणे, पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारणे, उद्योग व्यावसायिक आस्थापना यांचे कामकाज बंद करणे. तसेच खालील प्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल. गुन्ह्यांचे स्वरुप पहिला गुन्हा, दुसरा गुन्हा व तिसरा गुन्हा, दंडाची रक्कम व स्वरुप रु.5000/-, रु.10000/- व रु.25000/- व 3 महिन्याचा कारावास राहील.

याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जुलै 2022 रोजी, सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यत एकल प्लास्टिक वापराबाबत जनजागृतीपर कार्यशाळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर कार्यशाळेसाठी नागरिक, दुकानदार, प्लास्टिक निर्माते, शाळा, महाविद्यालय, महिला बचत गट व सामाजिक संस्था तसेच निमशासकीय संस्था यांनी सदर कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाम बीच मार्गालगत कोपरी गाव सिग्नल जवळ नाल्यात पडली कार