मंत्रालय क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत एकता पॅनलचा प्रचंड मतांनी विजय

दि. महाराष्ट्र मंत्रालय को. ऑप. क्रेडिट सोसायटी निवडणुकीत एकता पॅनलचा विजय

नवी मुंबई : दि. महाराष्ट्र मंत्रालय को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या व्यवस्थापकिय संचालक मंडळ निवडण्यासाठी 8 जुलै रोजी पार पडलेल्या निवडणुकीत एकता पॅनलचा भरघोस मताने विजय झाला आहे. राज्यभरातील 6 केंद्रांवर 2900 सभादांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावत एकता पॅनलच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. या निवडणुकीत एकता पॅनलतर्फे कोकण भवन मधील नगररचना कार्यालयातील माजी सैनिक अजित न्यायनिर्गुणे हे विजयी झाले असून त्यांचे सर्वच थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.  

सन 2022-2027 या कालावधीसाठी दि. महाराष्ट्र मंत्रालय को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या व्यवस्थापकिय संचालक मंडळाच्या निवडीसाठी 8 जुलै रोजी राज्यातील 6 ठिकाणी मतदान घेण्यात आले. राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचे वातावरण असताना तसेच कार्यालयीन दिवस असताना देखील 65 टक्के सभासदांनी मतदान केले. मागील 30-35 वर्षापासून या संस्थेची निवडणुक न झाल्याने या सोसायटीवर सहकार पॅनलच्या संचालक मंडळाचे एकतर्फी वर्चस्व निर्माण झाले होते. त्यामुळे या संस्थेमध्ये गैरप्रकार सुरु झाल्यामुळे या संस्थेच्या कारभारात परिवर्तन आणण्यासाठी राज्यभरातील विविध शाखेतील अनुभवी व प्रामाणिकपणे काम करणाऱया 15 सहकारी सदस्यांनी एकत्र येऊन एकता पॅनल तयार केले होते. तसेच विद्यमान सहकार पॅनल समोर आव्हान उभे केले होते.  


सहकार पॅनलव्दारे सभासदांच्या अडचणी त्यांचे प्रश्न सोडविले जात नव्हते. सभासदांनी घेतलेल्या कर्जावरील ज्यादा व्याजदर, संस्थेच्या मालकीच्या मालमत्तेचा गैरवापर अशा अनेक गोष्टींमुळे सहकार पॅनल बद्दल सभासदांच्या मनात अविश्वास निर्माण झाला होता. सभासदांमधील हाच असंतोष आणि अविश्वास या निवडणुकीच्या निकालातून जाहीर झाल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षापासून न सुटलेले सभासदांचे सर्व प्रश्न एकता पॅनलद्वारे सोडविली जातील अशी अपेक्षा सर्व सभासदांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विष्णुदास भावे नाट्यगृहात प्लास्टिक विषयक जनजागृतीपर कार्यशाळा