खारघर ते मुंबई विमानतळ बेस्ट  बस सेवा सुरू

 
खारघर : बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते  खारघर  दरम्यान बेस्ट बस सेवा सुरू झाल्यामुळे  खारघरवासी  समाधान व्यक्त करत आहे. बेस्ट सेवेमुळे प्रवाशाची पैशाची बचत होणार असून मानसिक त्रास देखील कमी होणार आहे. 
 
बेस्ट प्रशासनाकडून मुंबई विमानतळ ते वाशी डेपो दरम्यान धावणारी वातानुकुलीत  बससेवा सुरु आहे.  वाशी नवी मुंबई प्रमाणे खारघर मधील नागरिक देश विदेशात नोकरी व व्यवसाय निमित्त बाहेर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबई विमानतळ वरून  उबेर,ओला,टँक्सी सारख्या महागड्या सेवा पेक्षा अधिक  पटीने दर आकारतात. त्यामुळे खारघर वासियांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाशी ते मुंबई विमानतळ दरम्यान धावणारी बेस्ट बस खारघर पर्यंत वाढविल्यास राहिवासीयांसाठी अधिक सोयीचे होईल. असे पत्र भाजपचे  खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि समीर कदम यांनी महापौर कविता चौतमल आणि आयुक्त गणेश देशमुख याना दिले होते. सदर पत्राची दखल घेवून पनवेल पालिकेकडे बेस्ट प्रशासनाकडे  पत्र व्यवहार करण्यात आले होते. बेस्ट प्रशासनाने सोमवार ता.11 जुलै पासून  मुंबई विमानतळ ते वाशी दरम्यान धावणारी बेस्ट बस सेवा खारघर ते मुंबई विमानतळ दरम्यान सुरू केली आहे. 
 
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मंत्रालय क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत एकता पॅनलचा प्रचंड मतांनी विजय