सानपाडा रेल्वे स्थानकात पूर्वेकडे तिकीट खिडकी सुरु करण्यासाठी सुनिल कुरकुटे यांचे रेल्वे स्टेशन प्रबंधकांना पत्र

तिकीट खिडकी सुरु करा अन्यथा आंदोलन

नवी मुंबई - सानपाडा रेल्वे स्थानकात पूर्वेकडे तात्काळ तिकीट खिडकी सुरु करण्याची मागणी नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी ' ड ' प्रभाग समिती सदस्य सुनिल कुरकुटे यांनी गुरुवारी रेल्वे स्टेशन प्रबंधकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. सध्या सानपाडा रेल्वे स्थानकात फक्त एकाच बाजूला म्हणजे पश्चिमेकडे तिकीट खिडकी सुरु आहे. रेल्वेचा प्रवास हा जलद आणि स्वस्त असल्याने पश्चिमेकडील खिडकीवर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडालेली बघायला मिळते. एकाच बाजूला तिकीट खिडकी सुरु असल्याने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ फुकट वाया जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सानपाडा रेल्वे स्थानकात आता पूर्वेकडे बंद असलेल्या तिकीट खिडक्या तात्काळ कायमस्वरूपी सुरु कराव्यात आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी सुनिल कुरकुटे यांनी रेल्वे प्रशासनाला पत्रातून केली आहे. अन्यथा स्थानिक प्रवाशांना सोबत घेऊन रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुनिल कुरकुटे यांनी रेल्वे प्रशासनाला पत्रातून दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर ते मुंबई विमानतळ बेस्ट  बस सेवा सुरू